शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

औषधींचा तुटवडा; कोरोनाग्रस्तांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला,बेडच मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 05:00 IST

दररोज दीड हजारांच्या आसपास नवे रुग्ण डिटेक्ट होत आहे. त्या तुलनेत बेडची संख्या नसल्याने चंद्रपुरातील सर्व शासकीय रुग्णालयांतील व खासगी कोविड सेंटरमधील बेड फुल्ल झाले आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचाही तुटवडा भासत आहे. त्यामुळे गंभीर रुग्ण आणखी गंभीर होत मृत्यूच्या दिशेने जात आहेत. 

ठळक मुद्देनातेवाईकांची औषधींसाठी भटकंती : कोविड रुग्णांच्या औषधांकडे लक्ष देण्याची गरज

लाेकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढून बिकट होत चाललेली आहे. आरोग्य यंत्रणाही कोलमडल्यागत झाली आहे. दररोज दीड हजारांच्या आसपास नवे रुग्ण डिटेक्ट होत आहे. त्या तुलनेत बेडची संख्या नसल्याने चंद्रपुरातील सर्व शासकीय रुग्णालयांतील व खासगी कोविड सेंटरमधील बेड फुल्ल झाले आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचाही तुटवडा भासत आहे. त्यामुळे गंभीर रुग्ण आणखी गंभीर होत मृत्यूच्या दिशेने जात आहेत. यासोबतच सौम्य व मध्यम लक्षणे असलेेल्या रुग्णांना दिल्या जाणाऱ्या फेव्हीपिरॅव्हीर व इतर औषधींचा तुटवडा निर्माण झाला आहे. जे रुग्ण गृहअलगीकरणात आहेत, त्या घरातील सदस्य आपणही पॉझिटिव्ह होऊ, या भीतीने गरज नसतानाही इतर औषधी आधीच विकत घेऊन ठेवत आहेत. उलट ही औषधी मिळत नसल्याने भरती रुग्णांचा रुग्णालयात मुक्काम वाढत आहे. परिणामी, बेड्‌सची कमरता जाणवत आहे. आतील रुग्ण बाहेर येईनात आणि बाहेरील गंभीर रुग्णांना बेड मिळेना, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

माझ्या एका नातलगाला कोरोनाची बाधा झाल्याचे कोरोना चाचणी केल्यानंतर स्पष्ट झाले. त्याला गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याला रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. मात्र, चंद्रपुरात खासगी कोविड सेंटर व शासकीय कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनयुक्त बेड नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.- दुर्योधन कांबळे, चंद्रपूर.

कोविड १९ बाधित झालेल्या रुग्णाला डॉक्टरांना गृह विलगीकरणाचा सल्ला दिला आहे. त्यासाठी काही औषधे लिहून दिली आहे. यात फेबीफ्लू औषधीचाही समावेश आहे. मात्र, या गोळीचा तुटवडा निर्माण झाला आहे. बल्लारपुरातील सर्व मेडिकलमध्ये जाऊन आल्यानंतर केवळ एक दिवसाचाच डोस देण्यात आला. दुसऱ्या दिवशी पुन्हा गोळी घेऊन जा असा सल्ला मेडिकल संचालकाकडून दिला जात आहे. एक गोळी घ्यायला रुग्ण मेडिकलमध्ये किती फेऱ्या मारणार आहे, हाही प्रश्न आहे. - अमोल गेडाम, बल्लारपूर

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस