कोहीनूर तलावातील भाजीबाजारावरून धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 06:00 AM2020-03-29T06:00:00+5:302020-03-29T06:00:38+5:30

शहरातील गंजवार्डात अनेक वर्षांपासून भाजीबाजार भरत आहे. सकाळी ८ वाजतापासूनच या बाजारात ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळते. संचारबंदी असतानाही बाजार सुरू असल्याने कोरोनाचा प्रादूर्भाव होण्याचा धोका वर्तविण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात सूचना दिल्यानंतर मनपाने शनिवारपासून किरकोळ भाजी विक्रेत्यांना कोहीनुर तलावात पर्यायी व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. तलावात चुन्याने चौकटीही आखून दिल्या.

Shocked by the vegetable market in Lake Kohinoor | कोहीनूर तलावातील भाजीबाजारावरून धक्काबुक्की

कोहीनूर तलावातील भाजीबाजारावरून धक्काबुक्की

googlenewsNext
ठळक मुद्देमनपाचा निर्णय ठरला वादग्रस्त । भरलाच नाही गंज वार्डातील भाजीबाजार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना दहशतीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून गंज वार्डातील किरकोळ भाजी विक्रेत्यांसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून कोहीनुर तलावात बाजार भरविण्याचा निर्णय मनपाने शुक्रवारी घेतला होता. मात्र, तापत्या उन्हात व्यावसायिकांसाठी कुठलीही व्यवस्था नसल्याच्या कारणावरून व्यावसायिक व मनपा कर्मचाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. त्यामुळे मनपाचा निर्णय वादग्रस्त ठरला असून भाजीबाजारच भरला नाही. शहरातील शेकडो नागरिकांना भाजीपाल्याविना घरी परत जावे लागले.
शहरातील गंजवार्डात अनेक वर्षांपासून भाजीबाजार भरत आहे. सकाळी ८ वाजतापासूनच या बाजारात ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळते. संचारबंदी असतानाही बाजार सुरू असल्याने कोरोनाचा प्रादूर्भाव होण्याचा धोका वर्तविण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात सूचना दिल्यानंतर मनपाने शनिवारपासून किरकोळ भाजी विक्रेत्यांना कोहीनुर तलावात पर्यायी व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. तलावात चुन्याने चौकटीही आखून दिल्या. केवळ लिलाव करणाºयाना गाळेधारकांना विक्रेत्यांनाच सकाळी ९ वाजतापर्यंत गंजवार्डात व्यवसाय करण्याची मूभा देण्यात आली. मात्र, किरकोळ भाजीपाला विकता येणार नाही, अशा सूचना दिल्या. परंतु, किरकोळ विक्रेते माल उचलणार की नाही, या भीतीने बहुतांश गाळेधारक व्यावसायिकांनी शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा जोतिबा फुले बाजारात थोक भाजीपाला खरेदी केला नाही. काही किरकोळ विक्रेत्यांनी सकाळी दुकाने लावण्याची तयारी करत असताना मनपा पथकाने ध्वनीक्षेपकाद्वारे सूचना देऊन गंजवार्डातून हुसकावून लावले. कोहीनुर तलावात जाण्याचे आवाहन केले. परंतु, त्या ठिकाणी भाजीपाला विक्रीसाठी व्यवस्थाच नसल्याचा आरोप करून विक्रेते फिरकलेच नाही. दरम्यान, व्यवस्थेच्या कारणावरून सकाळी ११ वाजताच्या सुमारास काही विक्रेते व मनपा कर्मचाºयांमध्ये धक्काबुक्की झाल्याने भाजी बाजारच भरला नाही. त्यानंतर काही विक्रेत्यांनी रामाळा तलाव परिसरात दुकाने लावल्याचे दिसून आले.

हातठेल्यांवरून शहरात भाजीपाला विक्री
गंजवार्डातील भाजीबाजार नियोजित कोहीनुर तलावात न भरल्याने बºयाच किरकोळ विक्रेत्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा जोतिबा फुले बाजारातून भाजीपाला खरेदी करून हातठेल्यावरून वार्डावार्डात विक्री करीत आहेत.

Web Title: Shocked by the vegetable market in Lake Kohinoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.