शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रुग्णालयात पाण्याची भीषण टंचाई

By admin | Updated: May 18, 2015 01:19 IST

तालुक्याच्या भागात एकमेव असलेल्या ग्रामीण रुग्णालयात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.

ब्रह्मपुरी : तालुक्याच्या भागात एकमेव असलेल्या ग्रामीण रुग्णालयात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. येथे स्वतंत्र पाण्याची सोय नसल्याने संपूर्ण दवाखान्याची भिस्त नगर परिषदेच्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून आहे. परिणामी रुग्णांना व कर्मचाऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. ग्रामीण रुग्णालयात तालुक्यातील अनेक रुग्ण उपचारासाठी येतात. आजाराचे स्वरूप लक्षात घेऊन काही रुग्ण भरती असतात. त्यांच्यासोबत किमान एक व्यक्ती असते. जवळपास रुग्णांना व सोबतच्या व्यक्तीला लागणारे पाणी पुरविण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत पाणी पुरवठ्यासाठी ग्रामीण रुग्णालयात स्वतंत्र अशी सोय नाही. दवाखान्याच्या परिसरात एक बोअरवेल आहे. परंतु तीसुद्धा नादुरुस्त आहे. त्यामुळे दवाखान्यातील रुग्णांना तसेच तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांना नगर परिषदेच्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून रहावे लागत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात नळाचे पाणी मुबलक येत नसल्याने मागील एक दोन दिवसांपूर्वी ग्रामीण रुग्णालयात पाण्याचा ठणठणाट असल्याने रुग्णांची व त्याच्याजवळ राहणाऱ्या व्यक्तीची तारांबळ उडत आहे. १०० खाटांचे रुग्णालय करण्याचा प्रयत्न शासनस्तरावर केला जात आहे. परंतु पाण्याच्या स्वतंत्र सोईकडे मात्र कोणाचेही लक्ष नसल्याने भविष्यात गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. नादुरुस्त बोअरवेल दुरुस्तीसाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करूनही ती दुरुस्त केली जात नसल्याने कर्मचाऱ्याचे म्हणणे आहे. रुग्णालयासारख्या महत्वाच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. येथे स्वतंत्र पाण्याची सोय करून देण्याची मागणी रुग्णांकडून होत आहे. (प्रतिनिधी)