शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अद्यादेशाअभावी रखडले सातवे वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:56 IST

महाबीज कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप : सातवा वेतन आयोग लागू करावा फोटो : आंदोलनात सहभागी झाले महाबीजचे कर्मचारी. चंद्रपूर : ...

महाबीज कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप : सातवा वेतन आयोग लागू करावा

फोटो : आंदोलनात सहभागी झाले महाबीजचे कर्मचारी.

चंद्रपूर : शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महाबीजमधील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाने तयार केला. मात्र अद्यापही याबाबतचा अध्यादेश कृषी विभागाच्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाला मिळाला नाही. परिणामी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतनाची प्रतीक्षा लागून आहे. सातव्या वेतनाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी महाबीज बहुजन कर्मचारी, अधिकारी संघटनेतर्फे बुधवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे. रब्बी हंगामाला सुरुवात होताच महाबीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून सातवे वेतन आयोग लागू करण्यात आले. त्याच धर्तीवर महाबीजमधील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या अनुषंगाने महाबीज संचालक मंडळाने मंजुरी दिली. त्यामुळे सातवा वेतन आयोगाचा प्रस्ताव महाबीज तथा कृषी सचिव यांच्यामार्फत वित्त विभागास मंजूरीसाठी सादर करण्यात आला. वित्त विभागाने प्रस्तावित केल्यानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंत्रीमंडळाने सातव्या वेतना आयोगास मंजूर दिली. परंतु, वित्त मंत्रालयाकडून महाबीज फाईल कृषी विभागाकडे आली नाही. त्यामुळे कृषी विभागाचा महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून अद्यापही अद्यादेश अप्राप्त आहे. महाबीज स्वायत्त महामंडळ असल्याने महाबीजने सातव्या वेतन आयोगापोटी आर्थिक तरतूद केली आहे. त्यामुळे शासनाच्या तिजोरीवर कुठलाही भार पडणार नाही. त्यामुळे सर्व भत्ते लागू करण्यास महामंडळ स्वयंसक्षम आहे. सातव्या वेतनाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी अनेक साकडे घातले मात्र कुठलीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे ९ डिसेंबरपासून जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात महाबीज बहुजन कर्मचारी संघटनेचे प्रमुख सल्लागार सुभाष मेश्राम, विभागीय उपाध्यक्ष अजय फुलझेले, महिला संघटना कविता पाझारे, प्रवणी, वरठी, शरध ढवळे, सुरेश पांडे आदी सहभागी झाले आहेत.

बॉक्स

शेतकऱ्यांना बसणार फटका

सद्यास्थितीत खरीप हंगामातील उत्पादित सोयाबीन, धान व इतर पीकांची आवक बीज प्रक्रिया केंद्रावर सुरु आहे. तसेच रब्बी बिजोत्पादनाची कामे सुरु आहेत. तसेच धान पट्यात गहु, हरभऱ्याची पेरणी सुरु आहे. मात्र महाबीजचे कर्मचारी बेमुदत संपावर केल्याने या संपाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.