शालेय आहार; पण बसण्यास भोजनपट्टी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:30 IST2017-07-23T00:30:54+5:302017-07-23T00:30:54+5:30

सर्व शिक्षा अभियान अंतर्गत शासनाने माध्यान्ह भोजन उपक्रमाद्वारे गावातील प्राथमिक उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना जेवनांची सुविधा करुन स्तुत्य उपक्रम राबविणे सुरू केले असले ....

School diet; But there is no dormitory to sit | शालेय आहार; पण बसण्यास भोजनपट्टी नाही

शालेय आहार; पण बसण्यास भोजनपट्टी नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलपरसोडी : सर्व शिक्षा अभियान अंतर्गत शासनाने माध्यान्ह भोजन उपक्रमाद्वारे गावातील प्राथमिक उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना जेवनांची सुविधा करुन स्तुत्य उपक्रम राबविणे सुरू केले असले तरी काही शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्याची पुरेशी सुविधा नाही. शाळेत बसण्यासाठी जेवण करताना बसण्यासाठी भोजनपट्टी नसल्याने विद्यार्थ्यांना जमिनीवर खाली बसून भोजन करावे लागत आहे. यामुळे पालकवर्गामध्ये रोष व्यक्त करण्यात येत आहे.
तालुक्यात मागील तीन वर्षापासून सर्व शिक्षा अभियान अंतर्गत शिक्षण विभागाकडून प्रत्येक शाळांना भोजनपट्टी पुरविण्यात आली होती. ही भोजनपट्टी खराब होवून कुजलेल्या अवस्थेत असून कुबट वास येत असल्याने काही शाळांनी याचा वापर करणे बंद केले आहे. काही शाळेत शालेय सुधार फंडातून भोजनपट्टी खरेदी केल्याची माहिती आहे. मात्र काही शाळा अजूनही शिक्षण विभागाकडून ती मिळते का, याची वाट पाहत आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत विद्यार्थी जमिनीवर बसून भोजन करतानाचे चित्र आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने जमीन काहीसी ओलसर असतो व त्यामध्ये रोगजन्य जंतू असण्याची शक्यता आहे. याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.

Web Title: School diet; But there is no dormitory to sit