शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

म्हणे, नग्न पूजा केल्याने आजार बरे होतात!

By admin | Updated: March 19, 2016 00:38 IST

नग्नपूजा केल्याने दुर्धर आजार बरे होतात, अशी बतावणी करीत यासाठी एका युवतीला पैशाचे आमिष दाखवून पूजेसाठी तिचा वापर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ...

बंगाली बाबासह दोन महिलांना अटक : रामनगर पोलिसांची कारवाई चंद्रपूर : नग्नपूजा केल्याने दुर्धर आजार बरे होतात, अशी बतावणी करीत यासाठी एका युवतीला पैशाचे आमिष दाखवून पूजेसाठी तिचा वापर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांसह एका बंगाली बाबाला रामनगर पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे तक्रारकर्ती युवती, तिचे मित्र व नातलगांनी सापळा रचून भोंदूबाबाचा हा कट उधळून लावला.स्थानिक वरोरा नाका चौक परिसरातील रहिवासी दीपाली बिसन (३९) हिच्या मुलीला महिलांसंबंधी दुर्धर आजाराने ग्रासले होते. अनेक डॉक्टरांकडे जाऊनसुद्धा तिला आराम होत नव्हता. त्यामुळे तिला कुणीतरी करणी केली आहे, असा भ्रम दीपालीला झाला. दरम्यान, तुकूम भागातील रहिवासी रजनी चौधरी या ओळखीतल्या महिलेने दीपालीला एक विचित्र सल्ला दिला. एका बंगाली बाबाचे नाव सांगून त्याच्या हातून कुमारीका मुलीची नग्न पूजा केल्यास आजार बरा होतो, अशी माहिती दिली. यावर दीपालीने विश्वास ठेवला आणि त्या बाबाकडून पूजा करण्याचे ठरविले. त्यासाठी तिने तिच्याच मुलीच्या मैत्रिणीला या पूजेसाठी आॅफर दिली. बदल्यात एक लाख रुपये देण्याचे कबूल केले. मात्र हा प्रकार अत्यंत चुकीचा असल्याचे त्या युवतीच्या लक्षात आल्यानंतर तिने दीपालीशी त्या काळात सातत्याने झालेले संवाद आपल्या मोबाईलमध्ये टेप करून ठेवले. ही बाब तिने आपले काही मित्र व नातलगांना सांगितली. त्यानंतर हा प्रकार उधळून लावण्यासाठी व्यूहरचना आखण्यात आली. १६ मार्चला पूजा करण्याचे ठरले. त्यानुसार, दीपालीच्या वरोरा नाका परिसरातील घराभोवती सापळा रचण्यात आला. यात युवतीचे नातलग व मित्र सहभागी झाले होते. ठरल्याप्रमाणे १६ मार्चला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास युवती स्कुटीने दीपालीच्या घरी पोहोचली. तेथे अमित रामचंद्र मवाली (३२) हा भोंदूबाबा, देपाली बिसन व रजनी चौधरी हे उपस्थित होते. पूजेची तयारी सुरू असतानाच युवतीच्या नातलग व मित्रांनी घरात शिरून या सर्वांना पकडले. त्यानंतर रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी भोंदूबाबासह तिघांनाही अटक केली असून त्यांच्याविरुद्ध कलम ३ (३), जादूटोणाविरोधी कायदा सन २०१३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. (प्रतिनिधी)