शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

साबांवि कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या

By admin | Updated: May 15, 2015 01:05 IST

सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.

चंद्रपूर : सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यात बांधकाम विभाग क्रांक एकचे कार्यकारी अधिकारी निरंजन तेलंग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (रोहयो) कार्यकारी अधिकारी वामन भावे यांचा समावेश आहे.निरंजन तेलंग यांचे स्थानांतरण पुणे येथे याच पदावर झाले आहे. त्यांच्या रिक्त पदावर अद्याप कुणाचे नाव आले नसले तरी भंडारा जिल्हा परिषदेतील कार्यकारी अभियंता धाबे चंद्रपूरला येण्याची शक्याता वर्तविली जात आहे. अद्याप कुणी अधिकारी न आल्याने निरंजन तेलंग यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक एकचे उप विभागीय अभियंता डी. के. लेहगावकर यांच्याकडे या पदाचा प्रभार सोपविला आहे. मागील तीन वर्षांपासून ते बांधकाम विभाग क्रमांक एक मध्ये कार्यरत होते. प्रामाणिक आणि संवेदनशिल अधिकारी अशी त्यांची खात्यामध्ये ओळख आहे.बांधकाम विभागातील रोहयोचे कार्यकारी अभियंता वामन भावे यांचेही स्थानांतरण अचलपूर येथे झाले आहे. त्यांच्या रिक्त पदावर संगीता जयस्वाल या येत आहेत. भावे यांनी पदभार सोडला असून उपविभागिय अभियंता नेवारे यांच्याकडे तात्पुरता प्रभार सोपविला आहे. येत्या आठवडाभरात नवे अधिकारी रूजू होण्याची शक्यता सुत्रांकडून वर्तविली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)अधिक्षक अभियंत्यांचे पद पाऊणेदोन वर्षांपासून प्रभारीचंद्रपूरच्या बांधकाम विभागातील अधिक्षक अभियंत्यांचे पद गेल्या पाऊणेदोन वर्षापासून रिक्त असल्याने प्रभारी अधिकाऱ्यांच्या बळावर चंद्रपूर मंडळाचा गाडा हाकला जात आहे. येथील अधिक्षक अभियंता बळवंत लुंगे यांच्या निवृत्तीनंतर जनबंधू यांच्याकडे प्रभार सोपविण्यात आला होता. तब्बल दिड वर्ष ते या पदावर प्रभारी अधिक्षक अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यानंतर ते जिल्हा परिषदेला गेल्यावर त्यांच्या रिक्त पदावर पुन्हा प्रभारी अधिकारीच आले. वर्धा डिव्हिजनचे अधिक्षक अभियंता गायकवाड यांच्याकडे गेल्या तीन महिन्यांपासून या पदाचा प्रभार आला आहे. वर्धा जिल्ह्यातील नियमित कामातून मिळालेला वेळ ते चंद्रपूरला देतात. तब्बल पाऊणेदोन वर्षांंपासून येथे पूर्णवेळ अधिकारी मिळालाच नाही.