शनिवारी १४ कोरोनाबाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:27 IST2021-02-07T04:27:05+5:302021-02-07T04:27:05+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत ३९२ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३५४, तेलंगणा १, बुलडाणा १, गडचिरोली १९, यवतमाळ १५, ...

On Saturday, 14 coronadillas were added | शनिवारी १४ कोरोनाबाधितांची भर

शनिवारी १४ कोरोनाबाधितांची भर

जिल्ह्यात आतापर्यंत ३९२ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३५४, तेलंगणा १, बुलडाणा १, गडचिरोली १९, यवतमाळ १५, भंडारा १ आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

शनिवारच्या बाधितांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील ८, चंद्रपूर तालुक्यात ४, सावली १ व वरोरा येथील १ रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रुग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यांतून अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघताना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावेत तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: On Saturday, 14 coronadillas were added