शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ सेवेला सलाम

By admin | Updated: May 12, 2015 00:51 IST

आजारी सैनिकांची सेवा करणारी जगातील पहिली नर्स म्हणजे प्लॉरेन्स नाईटिंंगेल होय. ज्याप्रमाणे माणूस देवळात जातो,

आजारी सैनिकांची सेवा करणारी जगातील पहिली नर्स म्हणजे प्लॉरेन्स नाईटिंंगेल होय. ज्याप्रमाणे माणूस देवळात जातो, त्यावेळी तो प्रथम कळसाला वंदन करतो. कारण तो उंच आणि सोन्याचा असल्याने सूर्य प्रकाशात चमकत असतो. पण कळस चमकण्यासाठी तो उभा करण्यासाठी दगड माती यांचा पाया उभा केलेला असतो. त्या पायावर मंदिर बांधलेले असते. त्यामुळे आपले लक्ष कळसावर केंद्रीत होते. त्याप्रमाणे आज सर्व रुग्णालयांमध्ये रुग्णांची सेवा करताना सर्व परिचारिका भगिनी निरपेक्ष भावनेतून रुग्ण सेवा करतात. ही रुग्णसेवा एका महान महान व्यक्तीने केली. ती व्यक्ती म्हणजे फ्लॉरेन्स नार्इंटिगेल होय. फ्लॉरेन्स नाईर्टिगेल याचा जन्म इटालीमधील फ्लॉरेन्स या गावी १२ मे १८२० रोजी अतिशय श्रीमंत घराण्यात झाला. त्यांच्या घरी नोकर-चाकर होते. त्यांना कशाची पण उणिव नव्हती. त्यांच्याकडे आलेल्या गोर-गररीब माणसांविषयी त्यांना तळमळ वाटे, प्रेम माया वाटे. या लोकांकरिता आपण काही तरी करावे, असे त्यांना सतत वाटे. पण घरच्या श्रीमंत परिस्थितीमुळे त्यांना काही करता येत नव्हते.रशियन क्रिमीयन युद्धाचा तो काळ होता. १८५४ साली रशियन सैनिकांना सिस्टर आॅफ चॉरिटी नर्सिंग मदत करीत असत. पण इंग्लडच्या सैनिकांना मात्र कुणीही मदत करत नव्हते. अशावेळी त्यांचे दु:ख पाहून फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांनी आपले पथक तयार करुन हजारो सैनिकांचे प्राण वाचविले. त्यांना या दु:खातून सोडवून त्यांचे प्रमाण वाचविले. युद्धभूमीवर जावून त्यांची सेवा केली.त्यामुळे हजारो सैनिकांचा जीव वाचला. जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून त्यांनी मदत केली. रात्रीच्यावेळीसुद्धा हातात मेणबती घेऊन सैनिकांची विचारपूस, सेवा केलीय त्याचमुळे फ्लॉरेन्स नाईटिंगेला ‘लेडी वुईथ लॅम्प’ ही पदवी बहाल करण्यात आली.फ्लॉरेन्स नाईटिंगेलने सेन्ट थॉमस हॉस्पीटलमध्ये १८६० साली नर्सिंग स्कूल सुरू केले. यातूनच प्रेरणा घेऊन आज सर्व रुग्णालयांमध्ये नर्सिंग स्कूल काढण्यात आल्या आहेत. त्यात दरवर्षी शेकडो परिचारिका शिक्षण घेत आहेत. त्याचे हे श्रेय सर्व प्लॉरेन्स नाईटिंगेल यांनाच मिळते. डॉक्टरांच्याही आधी ज्यांच्याकडून सुश्रृश्येला सुरूवात होते त्या असतात, परिचारिका. आपले कौटुंबिक कर्तव्य बाजुला ठेवून आजारी माणसांच्या सेवेत राबणाऱ्या या परिचारिका सेवाव्रतीच नव्हे, तर कधीकधी देवदूतही वाटतात. रूग्णसेवेत वाहून घेण्याची प्रेरणा ज्या प्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्याकडून मिळाली, त्या नक्कीच मोठ्या आहेत. १८५४ च्या रशियाविरुद्ध क्रियमन युद्धाच्या वेळी ब्रिटन युद्ध सचिवांच्या विनंतीवरुन फ्लॉरेन्स प्रशिक्षित परिचारिकांसह स्कुवरी येथील सैनिकी रुग्णालयात जखमी सैनिकांची शुश्रूषा करण्यासाठी दाखल झाल्या. तेथील युद्धकाळाच्या अत्यंत गलीच्छ वातावरणात, औषधे, साधन-सामग्रीच्या तुटवड्यात, बिकट परिस्थितीला तोंड देत त्यांनी जखमी सैनिकांची शुश्रूषा करुन मृत्यूचं प्रमाण कमी केलं.१९१० मध्ये फ्लॉरेन्स जरी आपल्यातून निघून गेल्या तरी त्यांच्या कार्याचा ‘दीप’ आजही परिचारिकांच्या कार्याच्या रुपाने आपल्या सेवेत तेवत आहेत. आज नर्सिंगच्या कामाकडे खूप आदराने पाहिले जाते. अनेक युवती परिचारिका होण्यास उत्सूक आहेत. हेच फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या कठोर परिश्रमाचे सार्थक आहे.