शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विहिरगाव, हरदोना खुर्द येथे रूरल हाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:50 IST

चंद्रपूर : ग्रामीण भागात विक्री व्यवस्था निर्माण व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाकडून जिल्हयात रूरल हाट नावाचा नावीण्‍यपूर्ण ...

चंद्रपूर : ग्रामीण भागात विक्री व्यवस्था निर्माण व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाकडून जिल्हयात रूरल हाट नावाचा नावीण्‍यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे. राजुरा तालुक्यातील विहीरगाव व हरदोना खुर्द येथे रूरल हाट सुरू झाले. अगदी पहिल्याच दिवशी ग्राहकांनी विविध वस्तूंची खरेदी करुन स्वयंसहायता समूहांचा उत्साह वाढविला.

बचतगटातील महिला विविध वस्तूंचे उत्पादन करतात. मात्र, त्यांना स्थानिक बाजारपेठ मिळत नाही. ही अडचण लक्षात घेऊन उमेद अभियानातील बचतगटांच्या महिलांनी पुढाकार घेतला आहे. ग्रामपंचायतीची परवानगी मिळवून गावातच दैनिक किंवा आठवडी छोटेखानी बाजार सुरू करण्याच्या संकल्पनेने अनेकांना सुविधाजनक झाले आहे. विशेषकरून स्थानिक भाजीपाला उत्पादकांना याचा फायदा होणार आहे. दि. २ फेब्रुवारी रोजी चुनाळ विरूर प्रभागातील विहीरगाव येथील मा जिजाऊ महिला ग्रामसंघाद्वारे रूरल हाटचे उद्घाटन झाले. यावेळी पंचायत समितीचे सभापती मुमताज जावेद, उपसभापती मंगेश गुरनुले, पंचायत समिती सदस्य माणुसमारे, माजी सभापती जेनेकर, सचिव सूर्यवंशी, जिल्हा व्यवस्थापक प्रवीण भांडारकर, तालुका अभियान व्यवस्थापक डोंगरे, तालुका व्यवस्थापक पडवे, भडके, प्रभाग -समन्व्यक अमित भगत, ग्रामसंघ पदाधिकारी व समूहातील सदस्य उपस्थित होते. रूरल हाटमध्ये दहा समूहांतील सदस्यांनी स्वनिर्मित वस्तू विक्रीसाठी ठेवल्या. आर्वी-पाचगाव प्रभागातील हरदोना खुर्द येथील सुरक्षा महिला ग्रामसंघद्वारे रूरल हाट सुरू केले. उद्घाटन उपसभापती गुरनुले यांनी केले. यावेळी सरपंच सूर, सचिव मेश्राम, प्रभाग समन्वयक साईकिरण धोटे, ग्रामसंघ पदाधिकारी व समूह सदस्य उपस्थित होते. १२ समूहांतील सदस्यांनी आपल्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या. या संकल्पनेचा इतर तालुक्यांनीही अनुसरण कराव, असे आवाहन मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन ताजने यांनी केले आहे.