कोरपना : तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना या मार्गावरून ये-जा करणे कठीण झाले आहे. यात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
ग्रामीण क्षेत्रातील प्रमुख समजल्या जाणाऱ्या माथा - शेरज, पिपरी - लोणी , नारडा - आवारपूर, आसन - आवारपूर, रामपूर - वडगाव, कुसळ- कमलापूर, सावलहिरा - खैरगाव, येरगव्हण - हातलोणी, लालगुडा - नांदा , भोयगाव - भारोसा, नारडा - नारडा फाटा, वनोजा - वनोजा फाटा , सांगोडा - कारवाई, धानोली - धनकदेवी, वनसडी - कारगाव, गडचांदूर - नांदा , कोरपना - पारडी , रुपापेठ - खडकी, कोडशी - कोरपना , कन्हाळगाव - मांडवा
आदी मार्गावर मोठ्या प्रमाणात झुडपे वाढल्याने समोरून येणारे वाहन किंवा व्यक्ती दिसून येत नाहीत. परिणामी, अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यानंतरही संबंधित विभागाने या मार्गावरील झुडपांचे व्यवस्थापन केले नाही. त्यामुळे ग्रामस्थांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.