एकाच दिवशी ६८३ प्रकरणांचा लागला निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:01 IST2020-02-11T05:00:00+5:302020-02-11T05:01:01+5:30

न्यायाप्रविष्ठ प्रकरणांचा निपटारा व्हावा, नागरिकांचा पैसा, वेळ तसेच शारीरिक श्रम वाचावा यासाठी जिल्हा न्यायालय, तालुका न्यायालयातर्फे चंद्रपूर येथे लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष दिनकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्याायालयाच्या सुचनेनुसार या लोकअदालत घेण्यात आली.

Result of 683 cases in one day | एकाच दिवशी ६८३ प्रकरणांचा लागला निकाल

एकाच दिवशी ६८३ प्रकरणांचा लागला निकाल

ठळक मुद्देवेळ आणि पैशाची बचत : सामंजस्याच्या भूमिकेमुळे मिळाला न्याय

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा न्यायालय तसेच तालुका न्यायालयात शनिवारी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ६८३ प्रकरणे निकाली काढण्यात आले. यामध्ये एक कोटी रुपयांपेक्षा अधिक तडजोड रकमेचा समावेश आहे. सामंजस्याची भूमिका घेत अनेक वाद निकाली निघाले.
न्यायाप्रविष्ठ प्रकरणांचा निपटारा व्हावा, नागरिकांचा पैसा, वेळ तसेच शारीरिक श्रम वाचावा यासाठी जिल्हा न्यायालय, तालुका न्यायालयातर्फे चंद्रपूर येथे लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष दिनकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्याायालयाच्या सुचनेनुसार या लोकअदालत घेण्यात आली.
चंद्रपूर जिल्हा मुख्यालयासह सर्व तालुकास्तरीय न्यायालयात एकाच दिवशी लोकअदालत घेण्यात आली. यामध्ये प्रलंबित समझोतायोग्य प्रकरणे, न्यायालयात येण्यापूर्वीची प्रकरणे ठेवण्यात आली होती. यामध्ये विविध पक्षकांनी सहभाग घेतला. यामध्ये तडजोड करून वाद मिटविण्यात आले. यामुळे नागरिकांचा त्रास आणि प्रशासनाला ताण कमी झाला आहे.

आर्थिक, शारीरिक श्रम वाचले
या लोकअदालतीमुळे दोन्ही पक्षकारांचे न्यायालयात येण्यापूर्वीचे प्रकरण निकाली काढण्यात आले आहे. त्यामुळे पक्षकांचे आर्थिक आणि शारीरिक श्रम वाचले. सामंजस्यामुळे हे शक्य झाले. यामुळे प्रशासकीय स्तरावर कामाचा येणारा ताणही कमी झाला.

यांनी केला निपटारा
४जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.डी.केदार, दिवाणी न्याायाधीश एस.एस. मौदेकर, एन.एस. बेदरकर, एम.एस. काळे, कामगार न्यायालयाच्या न्यायाधीश खान, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाय.के. राऊत, एस.आर. जाधव, एन.ए. मोर यांनी पॅनल न्यायाधीश म्हणून काम बघितले.

Web Title: Result of 683 cases in one day