शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

गडचांदूर शहर प्रदूषणाच्या विळख्यात

By admin | Updated: December 22, 2014 22:44 IST

गडचांदूर हे प्रदूषणाच्या कचाट्यात सापडलेले शहर आहे. सिमेंट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात प्रदूषणाची तिव्रता प्रचंड वाढली आहे. वायू, जल आणि ध्वनी प्रदूषणाने नागरिकांचे जगणे असह्य झाले

आशिष देरकर - गडचांदूरगडचांदूर हे प्रदूषणाच्या कचाट्यात सापडलेले शहर आहे. सिमेंट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात प्रदूषणाची तिव्रता प्रचंड वाढली आहे. वायू, जल आणि ध्वनी प्रदूषणाने नागरिकांचे जगणे असह्य झाले असून प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी नगरपरिषदेने त्वरीत उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे.उद्योग जगतात अग्रेसर असलेल्या माणिकगड सिमेंट कंपनीमुळे येथील प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने माणिकगडच्या वाढीव उद्योगाला परवानगी दिल्याने त्यात आणखीणच भर पडली आहे. त्यामुळे गडचांदुरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत.जड वाहतुकीमुळे फुटलेले रस्ते, कच्च्या रस्त्यावरील पार्किंग, सिमेंट कंपनी व वाहनांचा धूर यामुळे गडचांदुरात २४ तास वायु प्रदूषण असते. माणिकगड सिमेंट कंपनी ही अगदी शहरालगत असल्यामुळे कंपनीशी संबंधित सर्व बाबींचा शहराशी संबंध येतो. कंपनीमध्ये वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून निघणाऱ्या व रस्त्यावरील धुळीमुळे गडचांदूरवासी त्रस्त झाले आहेत.घरात तर गृहिणींना सकाळ- सायंकाळ दोनदा साफसफाई करावी लागते. दारे, खिडक्या बंद असल्या तरी धूळ शिरते कुठून, असा प्रश्न गृहिणी करताना दिसतात. रोज कितीही स्वच्छता केली तरी घरातील टाईल्सवर धुळीचे कण आढळतात. हवेतील सिमेंटचे कण बाहेरील वाहनांवरही पडून राहतात. कंपनीच्या सभोवताल वस्तीत बघितले तर घराच्या छतावर धुळीचे थर साचलेले आहे. कवेलूचा रंग बदलून काळा झाला आहे. त्यामुळे गडचांदुरवासीयांना मानसीक त्रास सहन करावा लागत आहे. माणिकगडच्या वाढीव प्रकल्पामुळे गडचांदुरातील शिक्षक कॉलनीत नागरिकांना वास्तव्य करणे कठीण झाल्याचे नागरिक सांगतात. गडचांदुरातील शेती माणिकगड सिमेंटच्या धुरामुळे नेहमी करपून जात आहे. झाडांच्या पानावर सिमेंटचे कण पडून झाडांची वाढ खुंंटत असल्याने शेतीचे प्रचंड नुकसान होत असून शेतकरी हवालदिल झाला आहे.