शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
5
ना बाजारात विकत, ना जेवणात वापरत, भारतीत एकमेव शहर, येथे  कांदा, लसुणीच्या वापरावर आहे पूर्ण बंदी
6
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
7
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
8
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
9
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
10
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
11
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
12
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
13
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
14
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
15
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
16
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
17
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
18
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
19
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
20
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मामा तलावांच्या दुरूस्तीने सिंचनाचे भाग्य उजळणार

By admin | Updated: December 26, 2015 01:18 IST

चंद्रपूर जिल्ह्यात १३२ मामा तलाव जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत आहेत. या मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीचा कालबद्ध कार्यक्रम शासनाने अलिकडेच आखला आहे.

योग्यरीत्या व्हावी कामे : शेतकऱ्यांना मोठी अपेक्षासावली : चंद्रपूर जिल्ह्यात १३२ मामा तलाव जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत आहेत. या मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीचा कालबद्ध कार्यक्रम शासनाने अलिकडेच आखला आहे. मात्र प्रशासकीय यंत्रणा तोकडी असल्याने त्यांच्यावर कामाचा भार वाढणार असून मामा तलावापासून संपूर्ण सिंचन होईल का, असा प्रश्न शेतकरी वर्गाकडून केला जात आहे.मामा तलावांची दुरुस्ती या विषयात गाळ उपसणे, मुरुम टाकणे, गवत कापने या कामांचा समावेश आहे. मात्र याचा सरळ फायदा अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या पलिकडे शेतकऱ्यांना होईल, असे दिसत नाही. शेतीच्या सिंचनाशी या तलावाच्या दुरुस्तीचा काही एक संबंध नाही, असे तज्ञांचे मत आहे. पाणी वाटप करण्यासाठी शासनाने पाणी वापर संस्था निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सुमारे २५० नोंदणीकृत संस्था अकार्यक्षम ठरल्या आणि त्या अवसायानात निघाल्या आहेत. त्यामुळे नवीन कामे करताना याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. शासनाने दुरुस्तीचे दरपत्रक अजूनही सुधारीत केले नाही. सुमारे २००३ पासून प्रती हेक्टर २८ हजार रुपये दुरुस्तीचा दर ठरविण्यात आला असून अजूनही तोच दर कायम आहे. ५० हजार रुपये वाढीव दर प्रस्तावित आहे. परंतु अजूनही त्याच्यात दुरुस्ती करण्यात आलेली नाही, त्यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून किती तलावाचे भाग्य पलटून शेतकऱ्यांना कितपत लाभ होईल, याची प्रतीक्षा आहे.पाटचाऱ्यांचीही व्हावी दुरुस्तीमामा तलावाच्या दुरुस्तीसाठी जिल्ह्यात १०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे २८ कोटी रुपयाचा निधी देण्यात आल्याची माहिती आहे. परंतु, ज्या यंत्रणेकडून ही कामे करण्यात येणार आहेत, त्यांच्याकडे कामे किती, मनुष्यबळ किती याचाही विचार होण्याची गरज आहे. तलावाच्या दुरुस्तीचेच कामे न करता त्यात पाटचाऱ्याही दुरुस्त करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पाटचाऱ्या दुरुस्त झाल्या नाही तर तलावाची कितीही दुरुस्ती केली तरी शेतापर्यंत पाणी पोहचणे कठीण होईल आणि पर्यायाने पाणी उशीरा मिळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होतच राहील. संपूर्ण सिंचन क्षमता निर्माण व्हावीपूर्वीच्या काळात मालगुजारांनी ज्या तलावांची निर्मिती केली, ती केवळ संरक्षित सिंचनाकरीता केली आहे. संरक्षित सिंचनाकरीता तयार करण्यात आलेल्या मामा तलावातून मिळणारे पाणी पिकाच्या शेवटच्या कालावधीत एकदाच मिळते. परंतु संपूर्ण सिंचन करावयाचे असल्यास किमान तीन पाळीत पाणी देणे आवश्यक असते. त्यामुळेच मामा तलाव संपूर्ण सिंचन करण्यास समर्थ ठरणे आवश्यक आहे. तलावांचे लघु पाटबंंधारे म्हणून रूपांतरित करावेमामा तलावांची दुरुस्ती करण्यासाठी पहिल्यांदा त्या तलावांचे लघु पाटबंंधारे म्हणून त्यांना रुपांतरीत करणे महत्त्वाचे आहे. तलावांचे शासकीय दृष्टीकोनातून सर्व्हेक्षण करावे, सांडव्यांचे नवनीकरण करावे अशा प्रकारच्या अनेक उपाययोजना तज्ञांनी सुचविल्या आहेत.