शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

मूलभूत हक्कापासूनच नागरिक दूर

By admin | Updated: January 27, 2015 23:31 IST

चंद्रपूर शहराचा विकास असंतुलित असल्याचे सध्या दिसून येत आहे. सर्व प्रभागासाठी एकच महानगरपालिका असतानाही काही प्रभागात विकास एकवटल्याचे दिसते. त्यामुळे काही प्रभाग अजूनही

रवी जवळे - चंद्रपूरचंद्रपूर : चंद्रपूर शहराचा विकास असंतुलित असल्याचे सध्या दिसून येत आहे. सर्व प्रभागासाठी एकच महानगरपालिका असतानाही काही प्रभागात विकास एकवटल्याचे दिसते. त्यामुळे काही प्रभाग अजूनही अविकसित आणि दुर्लक्षित आहेत. चंद्रपूर महानगरपालिका हद्दीच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभागातही याचाच प्रत्यय येतो. येथील नागरिकांना आजही आपल्या मुलभूत हक्कासाठी संघर्ष करावा लागत आहे. या प्रभागातील अनेक वस्त्यांमध्ये विकास झालेला नाही. रस्ते, नाल्यांचाच प्रश्न अद्याप सुटू शकला नाही. या प्रभागात बोटावर मोजण्याइतक्या भागातच थोडीफार विकासाची कामे झाली आहे. टॉवर टेकडी परिसर तर विकासापासून कोसोदूर असल्याचे दिसून येते. येथे रस्ते, पाणी, नाल्या, पथदिवे असे एक ना अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत.महानगरपालिकेच्या तिजोरीत दरवर्षी कोट्यवधीचा निधी येत असला तरी शहरात विकासकामे करायला महानगरपालिका प्रशासन का कमी पडत आहे, तेच कळत नाही. मनपा प्रशासन नागरिकांकडून विविध टॅक्स न चुकता वसूल करते. नागरिकांसाठी असलेल्या विविध योजनांचा निधीही शासनाकडून प्राप्त करते. मात्र नागरिकांना मुलभूत सोई-सुविधा पुरविल्या जात नाही. लोकमतच्या ‘लोकमत जागर’ या अभियानात सातत्याने याचा प्रत्यय येत आहे. परिणामी नागरिक चांगलेच संतापलेले दिसून येतात.लोकमत चमूने आज मंगळवारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभागात फेरफटका मारला. यावेळी नागरिकांनी मनपा प्रशासनाविरुध्दचा आपला संतापच लोकमतजवळ व्यक्त केला. या प्रभागातील टॉवर टेकडी परिसरात एकही मुलभूत गोष्ट मनपा नागरिकांना पुरवू शकलेली नाही. संपूर्ण टॉवर टेकडी परिसरातच रस्त्यांचा प्रश्न बिकट आहे. एकही रस्ता चांगला असल्याचे लोकमतच्या पाहणीत आढळून आले नाही. एका रस्त्यावर डांबरीकरण केव्हातरी केले असावे. आता केवळ या रस्त्यावर गिट्टीच वर आल्याचे दिसते. उर्वरित रस्त्यांना तर रस्ते म्हणणेही संयुक्तिक होणार नाही. नागरिकांना आपल्या घरी पायवाटेच जावे लागते. मातीची पायवाटच येथील नागरिकांसाठी रस्ते आहेत. या ठिकाणी रस्ते नाही तर नाही; पण नाल्याही कुठे दिसत नाही. काही लोकांनी सांडपाण्यासाठी आपल्याच खर्चाने पाईप बसविले आहे. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहते.टॉवर टेकडी परिसरात आणखी एक समस्या मोठी आहे. हा परिसर जंगलाला लागून असून शहराच्या शेवटच्या टोकावर आहे. मात्र या परिसरात पथदिवे लावण्याचे सौजन्य महानगरपालिकेने दाखविले नाही. कुठेच पथदिवे नसल्याने संपूर्ण परिसरातच रात्री अंधाराचे साम्राज्य असते. याबाबबत नगरसेवकांना वारंवार सांगितले तरीही नगरसेवक लक्ष देत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. टॉवर टेकडी वगळता इतर परिसरातही फारसा विकास झाल्याचे दिसले नाही. आंबेडकर नगर वॉर्डात थोडेफार रस्ते व नाल्यांची कामे झाली आहे. मात्र संत फकीर चौक, संत विक्तुबाबा मठ या परिसरातील रस्ते उखडलेले आहेत. नाल्याही तुटलेल्या आहे. माता नगर चौक व सम्राट चौकातही तीच स्थिती आहे. येथील नाल्यांची डागडुजी गरजेची आहे. सिध्दार्थ नगरातीलही रस्ते उखडलेले दिसले.