शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

त्रुटींसह होणार उड्डाण पुलाचे लोकार्पण

By admin | Updated: March 17, 2016 00:53 IST

सन २०१२ मध्ये बांधकाम सुरू झालेला येथील वरोरा नाका चौकातील उड्डाण पूल अखेर १ एप्रिलपासून त्रुटींसह वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.

कामाची कासवगती सुरूच : लाखोंचा दंड ठोठावूनही कंत्राटदार ढिम्मचंद्रपूर : सन २०१२ मध्ये बांधकाम सुरू झालेला येथील वरोरा नाका चौकातील उड्डाण पूल अखेर १ एप्रिलपासून त्रुटींसह वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. तशी अधिकृत घोषणा झाली असली तरी अद्याप उड्डाण पुलालगतच्या आयटीआयसमोरील रस्त्याचे बांधकाम पूर्ण न झाल्याने १ एप्रिलपासून हा उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला होणार का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. विशेष म्हणजे नवा उड्डाण पूल जुन्या पुलाला जोडताना मोठी त्रुटी निर्माण झाली असून त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. मूल मार्गाने जुन्या पुलावरून नव्या पुलावर चढताना त्या ठिकाणी मोठा खोलगट भाग तयार झाला आहे. त्यामुळे वाहनांना या खोलगट भागातून वळताना अपघात घडण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी व्यवस्थित ‘लेव्हलिंग’ करण्यात कंत्राटदाराने दिरंगाई केल्याचे दिसून येते. जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर यांनी नुकतीच या उड्डाण पुलाची पाहणी केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक गाडेगोने, कोडगिरवार, वाहतूक पोलीस निरीक्षक अशोक कोळी उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी उड्डाण पुलाच्या बांधकामाचा आढावा घेतला. यावेळी कार्यकारी अभियंता गाडेगोन यांनी पुलासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली. पुलाचे बांधकाम जवळपास काम पूर्ण झाले असून केवळ विजेचे खांब उभारण्याचे काम बाकी आहे. ते तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित कंत्राटदाराला देण्यात आले आहे. आयटीआयसमोरील रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती गाडेगोने यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर डॉ. दीपक म्हैसेकर यांनी येत्या १ एप्रिलपासून हा उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. सन २०१२ मध्ये या उड्डाण पुलाचे काम सुरू झाले. १६.३ कोटी रुपये खर्चाचा हा उड्डाण पूल सन २०१४ च्या अखेरीस पूर्ण करण्याचा करार कंत्राटदाराशी झाला होता. या कामाचे कंत्राट ठाणे येथील मे.अजय पाल मंगल अ‍ॅन्ड कंपनीला देण्यात आले होते. मात्र या कंपनीने सन २०१६ हे वर्ष उजाडले तरी उड्डाण पुलाचे काम पूर्णत्वास नेले नाही. परिणामी १६.३ कोटींचा खर्च २० कोटीच्या घरात गेला आहे. कंत्राटदार कंपनीची कामाबाबतची कासवगती लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने १ आॅक्टोबर २०१२ ते ३१ मार्च २०१४ या काळात दरदिवशी पाच हजार रुपये दंड ठोठावला. (स्थानिक प्रतिनिधी)एका विंगचे काम अद्याप बाकीचउड्डाण पुलावरून डॉ.आंबेडकर महाविद्यालयाकडे जाणाऱ्या विंगचे काम अद्याप सुरू झाले नाही. त्यामुळे उड्डाण पूल सुरू झाल्यानंतरही मूल मार्गाने येणाऱ्या वाहनांना आंबेडकर महाविद्यालयाकडे वळता येणार नाही. येत्या आॅगस्टपर्यंत या विंगचे काम पूर्ण होण्याची शक्यता सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केली आहे. मात्र उड्डाण पुलाच्याच कामाला इतका विलंब लागल्याने ठरावीक वेळेत या विंगचे काम पूर्ण होईल का, असा प्रश्न आहे.