शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्याची खरी जडणघडण संस्कारातूनच - चैतन्य महाराज

By admin | Updated: December 18, 2015 01:24 IST

माणसाच्या आयुष्याची खरी जडणघडण संस्कारातूनच होत असते. धर्माने सांगितलेल्या संस्कारांचे महत्व ओळखा आणि आयुष्य निरामय करा, ...

जगन्नाथबाबांचा वार्षिक जन्मोत्सव : हजारो भाविकांची उपस्थितीनंदोरी : माणसाच्या आयुष्याची खरी जडणघडण संस्कारातूनच होत असते. धर्माने सांगितलेल्या संस्कारांचे महत्व ओळखा आणि आयुष्य निरामय करा, असे आवाहन वढा येथील युवा योगी चैतन्य महाराज यांनी केले.स्थानिक जगन्नाथबाबा देवस्थान कमेटीच्या वतीने आयोजित श्री जगन्नाथबाबा यांचा वार्षिक जन्मोत्सव बुधवारी १६ डिसेंबरला नंदोरीतील देवस्थानात पार पडला. यावेळी झालेल्या स्वानुभव प्रवचनात ते बोलत होते. १४ डिसेंबरपासून या त्रिदिवसीय महोत्सवाला प्रारंभ झाला. त्याची सांगता महाप्रसाद आणि घुगरी काल्याने बुधवारी झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. धनराज आस्वले, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी गोपालकृष्ण मांडवकर, सरपंच अनुराधा पिंपळकर प्रामुख्याने उपस्थित होते. देवस्थान कमेटीच्या वतीने पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान नागपूर येथील रंजना संजय केवटे यांनी मंदीराला ५१ हजार रूपयांची देणगी दिल्याबद्दल त्यांचा सत्कर करण्यात आला. ह.भ.प. पांडूरंग लांबट महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर दहीडांडी फोडण्यात आली. तत्पूर्वी नंदोरी, डोंंगरगाव (खडी), वरोरा, मांगरूळ, पंढरपूर येथून आलेल्या पालख्यांचा आणि विविध ठिकाणांहून आलेल्या भजन दिंड्यांचा सन्मान करण्यात आला. सुमारे सहा हजारांवर भाविक या महोत्सवात सहभागी झाले होते. त्यामुळे परिसराला यात्रेचे रूप आले होते. (वार्ताहर)