कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 06:00 IST2019-11-27T06:00:00+5:302019-11-27T06:00:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : शेतकऱ्यांसाठी केंद्र्र व राज्य शासनामार्फत अनेक योजना सुरू आहेत. शेती उपयोगी तंत्रज्ञान प्रत्येक शेतकºयांच्या ...

Reach agro technology to farmers | कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवा

कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवा

ठळक मुद्देदेवराव भोंगळे : ‘माहिती आपल्या दारी ’अभियानाला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शेतकऱ्यांसाठी केंद्र्र व राज्य शासनामार्फत अनेक योजना सुरू आहेत. शेती उपयोगी तंत्रज्ञान प्रत्येक शेतकºयांच्या बांधावर पोचण्यासाठी प्रशासनाने कार्य करावे. संविधान दिनासारख्या पवित्र दिनी जिल्हा माहिती कार्यालयाने ‘माहिती आपल्या दारी’ अभियान सुरू केले. याचा शेतकºयांना निश्चित फायदा होईल, असा आशावाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी व्यक्त केला. मंगळवारी कृषी भवनातील चित्ररथ अनावरण सोहळ्यात बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती अर्चना जीवतोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अविनाश सोमनाथे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल काळभोर, कृषी उपसंचालक रविंद्र मनोहरे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, शेतकरी पांडुरंग कोकोडे, सिद्धार्थ फुलझेले, रोशन रामटेके, मौर्यकांत गोहने, विठ्ठल कोठे, पर्वतराव कुळमेथे आदींची उपस्थिती होती.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त प्रयत्नातून शेतकºयांच्या योजना शेतकºयांच्या दारी या अभियानाला सुरूवात झाली. अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांची देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता प्रोत्साहित केले जाणार आहे. चित्ररथाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष भोंगळे यांच्या हस्ते हिरवा वी झेंडी दाखवून गावोगावी फिरण्यासाठी रवाना करण्यात आला. आठवडी बाजाराच्या ठिकाणी आणि जादा लोकसंख्येच्या गावांमध्ये पथनाट्याच्या माध्यमातून योजनांची माहिती पोहोचवली जाणार आहे. याकरिता ३ लाख पत्रके शेतकºयाला वितरण करण्यात येणार आहे.
‘हॅलो चांदा’ चा उपयोग करावा
डब्लूडब्लूडब्लू डॉट, आपले सरकार डॉट महाराष्ट्र व डॉट जीओव्ही डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन अर्ज सादर करावा. अडचणी आल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘हॅलो चांदा’ हेल्पलाईनचा उपयोग करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी यावेळी केले.
७० टक्के निधी शेतकऱ्यांसाठी
‘माहिती आपल्या दारी ’अभियानासाठी जिल्हा माहिती कार्यालयत्ांर्गत ७० टक्के निधी शेतकरी योजनांच्या प्रसिद्धीसाठी वापरण्यात येणार आहे. यातून १५ तालुक्यांत १५ चित्ररथ गावोगावी फिरणार आहे, अशी माहिती कृषी व जिल्हा माहिती विभागाच्या वतीने देण्यात आली.

Web Title: Reach agro technology to farmers