शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

रोवणीचा धडाका; मात्र मजूरच मिळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:20 IST

शेतकरी पुन्हा हवालदिल : एकमेकांच्या शेतात जाऊन करतात कामे राजकुमार चुनारकर चिमूर : मागील काही दिवसांपूर्वी जोर धरलेल्या पावसाने ...

शेतकरी पुन्हा हवालदिल : एकमेकांच्या शेतात जाऊन करतात कामे

राजकुमार चुनारकर

चिमूर : मागील काही दिवसांपूर्वी जोर धरलेल्या पावसाने आठवडाभरापासून चांगलीच उसंत घेतली आहे. त्यामुळे चिमूर, नेरी, भिसी, खडसंगी, वाहानगाव, बोथलीसह विविध ठिकाणच्या भागात भात रोवणीच्या कामाला वेग आला आहे. असे असले तरी शेतात काम करण्यासाठी मजूरच मिळत नसल्याने मजुरांची कमतरता भासू लागली आहे. यामुळे शेतकरी पुन्हा हवालदिल होताना दिसत आहे.

या मजूर कमतरतेचा सामना करत रोववणीच्या कामाला शेतकऱ्यांनी सुरुवात तर केली. मात्र कामांना विलंब होत आहे. दुसरीकडे पावसाने उसंत घेतल्याने अनेक ठिकाणी रोवणी थांबली आहे. मात्र पावासाने दडी मरल्याने कापूस व सोयाबीन निंदणाचे काम एकाचवेळी सुरू झाले. त्यामुळे मजूर विभागले गेल्याने शेतकऱ्यांना मजुरांची कमतरता भासत आहे. अख्खे कुटुंब शेतात जात असल्याचे पाहून घरातील मुलेही आपला मदतीचा हात देत वडिलांना शेत कामाला मदत करीत आहेत.

यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हजेरी लावल्यानंतर महिनाभर पावसाने चांगली साथ दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलेले धान रोपे रोवणी करण्यायोग्य झाली. त्यामुळे भात लागवडीच्या कामाची लगबग सुरू झाली आहे. भातरोपे खणून त्याची लागवड करण्याचे काम सुरू आहे.

मात्र याही वर्षी शेतमजूर भात रोवणी व निंदनाचे काम करण्यात विभागले गेल्याने मजूर मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे भात लागवड करण्याच्या कामात अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. शेतकऱ्यांना शेतावर काम करण्यासाठी मजूर शोधावे लागत आहे. महतप्रयासाने दोन-चार महिला मजूर मिळत असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

बॉक्स

मजुराऐवजी कुटुंबातील सदस्यच कामात

मजूर नसल्याने काही शेतकऱ्यांनी घरातील सदस्य व नातेवाईक यांना सोबत घेऊन शेतातील कामे उरकण्यास सुरवात केली आहे. तर काही शेतकरी एकमेकांच्या शेतावर अदली-बदलीने जाऊन कामासाठी सहकार्य करीत आहेत. याच बरोबर शाळाबंद असल्याने घरातल्या घरात ऑनलाइन अभ्यासात कसरत करणारी मुलेही वडिलांची शेतकामाची परवड पाहून आपल्या परीने मदत करताना दिसत आहेत.

कोट

जून महिन्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे धानाचे पऱ्हे रोवणीसाठी तयार झाले तर दुसरीकडे एक आठवड्यात पावसाने दडी मारल्याने कापूस, सोयाबीनचे निंदनाचे काम एकाच वेळी आले. त्यामुळे उपलब्ध मजूर विभागले गेले. त्याचा फटका मजूर मिळत नसून मजुरीही वाढत आहे.

-प्रशांत कोल्हे, शेतकरी