शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने आणले डोळ्यात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 06:00 IST

ब्रह्मपुरी तालुक्यात २८ हजार ०५८ हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे. त्यापैकी २७ हजार ८२४ हेक्टर क्षेत्रात भातपीक घेण्यात आले आहे. त्यापैकी ३३ टक्क््यांच्या आतील नुकसानीस पात्र असलेले २११० हेक्टर क्षेत्र पंचनामा केल्यानंतर बांधित ठरले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील शेतकऱ्यांची दाणादाण : पहाडावरील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय

कर्जाच्या डोंगरामध्ये यावर्षी पडणार मोठी भररवी रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : अवकाळी पावसाने तालुक्यातील शेतकºयांचे मोठे नुकसान झाले असून आता जगायचे कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर वाढत असून यावर्षीच्या पावसामुळे पुन्हा त्यात भर पडली आहे.ब्रह्मपुरी तालुक्यात २८ हजार ०५८ हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे. त्यापैकी २७ हजार ८२४ हेक्टर क्षेत्रात भातपीक घेण्यात आले आहे. त्यापैकी ३३ टक्क््यांच्या आतील नुकसानीस पात्र असलेले २११० हेक्टर क्षेत्र पंचनामा केल्यानंतर बांधित ठरले आहे. तर ३३ टक्क््यांच्या वर नुकसान झालेले क्षेत्र २३२८ हेक्टर असल्याने ३३ टक्के नुकसान क्षेत्रामध्ये जवळजवळ ४४३८ हेक्टर शेतजमीनीवरील भात पीक नुकसानग्रस्त झाले आहेत. यापैकी ३५८६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये ४०५८ शेतकरी बाधित असल्याचे प्राथमिक अंदाज प्रशासनाने लावला आहे. उर्वरित ८५२ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे येत्या काही दिवसात पूर्ण होणार आहे. मात्र किमान शासनाने आर्थिक मदत करावी, अशी आर्त हाक शेतकऱ्यांची आहे. तालुक्यात कापूस, सोयाबिन व इतर पिके २३४ हेक्टर क्षेत्रात आहे. मात्र या पिकाचेही मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून कर्जाच्या डोगरावर आणखी भर पडली आहे.

टॅग्स :agricultureशेती