पहाडावरील रब्बी पिकाला अवकाळीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 05:00 AM2020-04-10T05:00:00+5:302020-04-10T05:00:36+5:30

सध्या कोरोनाची दहशत आहे. प्रत्येकजण घरात बसून आहे. त्यामुळे कामे ठप्प पडली आहे. शेतातसुद्धा काम करण्यासाठी मजूर येत नसल्याची स्थिती आहे. त्यातच शेतमालाला बाजारपेठही उपलब्ध नाही आणि मागणीही थांबली आहे. या संकटात आणखी वादळी वाºयाची भर पडली आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून दुसारच्या सुमारास वादळी पाऊस हजेरी लावत असल्यामुळे शेतात असलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Rabbi crop on the mountain prematurely hit | पहाडावरील रब्बी पिकाला अवकाळीचा फटका

पहाडावरील रब्बी पिकाला अवकाळीचा फटका

Next
ठळक मुद्देशेतकरी चिंतातूर : कोरोनाच्या दहशतीने डोळ्यात आणले पाणी

शंकर चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : खरीप हंगामातील उत्पादनात झालेली घट भरून काढण्यासाठी यावर्षी पहाडावरील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामाकडे लक्ष केंद्रीत केले. अनुकूल वातावरणामुळे यावर्षी पिकेही दमदार आली. मात्र दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले. कोरोनाच्या दहशतीत शेतकऱ्यांवर आणखी एक संकट कोसळले आहे.
सेवादासनगर येथील शेतकऱ्यांच्या ज्वारी व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तर पहाडावरील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरापाई द्यावी, अशी मागणी येथील सरपंच विमल राठोड यांनी तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
सध्या कोरोनाची दहशत आहे. प्रत्येकजण घरात बसून आहे. त्यामुळे कामे ठप्प पडली आहे. शेतातसुद्धा काम करण्यासाठी मजूर येत नसल्याची स्थिती आहे. त्यातच शेतमालाला बाजारपेठही उपलब्ध नाही आणि मागणीही थांबली आहे. या संकटात आणखी वादळी वाºयाची भर पडली आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून दुसारच्या सुमारास वादळी पाऊस हजेरी लावत असल्यामुळे शेतात असलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उभे असलेले पीक आडवे झाले आहे. खरीप हंगामातील पिके काढणीला आली तेव्हा परतीच्या पावसाने नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला. ही तुट भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी पिकाकडे अधिक लक्ष दिले. यासाठी खत, कीटकनाशक आदींचा मोठ्या प्रमाणात वापर केला. मात्र हा हंगामही शेतकऱ्यांच्या हातून गेला. त्यामुळे रब्बीनेही शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण केले नसल्याचे स्थिती आहे. एकिकडे कोरोनाची दहशत आणि दुसरीकडे निसर्गाची अवकृपा यामध्ये पहाडावरील शेतकरी अक्षरश: दबला गेला आहे.

यंदा रब्बी हंगामातील पिके चांगली आली होती. मात्र अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
- संजय चव्हाण
शेतकरी, सेवादासनगर.

अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करून मदत देण्याची गरज आहे.
- विमल राठोड,
सरपंच, नोकेवाडा

Web Title: Rabbi crop on the mountain prematurely hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.