शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

११ बाजार व १२ उपबाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:55 IST

चंद्रपूर : दिल्ली येथे आंदोलन करणाºया कृषी कायद्यांविरूद्ध दिल्ली येथे पुकारलेल्या भारत बंदमुळे मंगळवारी जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार ...

चंद्रपूर : दिल्ली येथे आंदोलन करणाºया कृषी कायद्यांविरूद्ध दिल्ली येथे पुकारलेल्या भारत बंदमुळे मंगळवारी जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील खरेदी विक्री ठप्प होती. त्यामुळे शेकडो शेतकºयांना शेतमाल विकता आला नाही. बुधवारी बाजार समित्या सुरू होताच विक्रीसाठी शेतकºयांनी प्रचंड गर्दी केल्याचे दिसून आले.

जिल्ह्यात १३ कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि १२ उपबाजार आहेत. बाजार समित्यांमध्ये ३४१ मापारी ८३१ कमिशन एजंट, १२७१ व्यापारी, १३३ प्रक्रियाकार, ३४१ हमाल कार्यरत आहेत. मूल, चंद्रपूर, वरोरा, राजुरा, भद्रावती, गोंडपिपरी, नागभीड, ब्रह्मपुरी येथील बाजार समित्यामध्ये सर्वात मोठ्या आहेत. केंद्र सरकारने केंद्र सरकारने २० सप्टेंबर २०२० रोजी कृषी क्षेत्राशी संबंधित तीन कायदे मंजूर केले. त्या कायद्यांना शेतकºयांचा विरोध असून त्यासाठीच हे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक, शेतकरी (सशक्तीकरण व संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार विधेयक व अत्यावश्यक वस्तू (दुरूस्ती) विधेयक २००० असे तीन कायदे तयार केले. हे कायदे अन्यायकारक असल्याचा आरोप करून शेतकºयांनी दिल्लीत आंदोलन सुरू केले. मंगळवारी भारत बंद पुकारल्यानंतर जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. परिणामस्वरूप, बाजार समित्यांमध्ये खरेदी बंद होती. याचा फटका शेतकºयांनाही बसला. बुधवारी चंद्रपूर, मूल, नागभीड, गोंडपिपरी, राजुरा, ब्रह्मपुरी,चिमूर बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी गर्दी केली होती.

बॉक्स

दिवसभर दीड कोटींचा व्यवहार ठप्प

खरीप हंगामातील शेतमाल विकण्यासाठी बहुतांश शेतकरी यंदा बाजार समित्यांनाच प्राधान्य देत आहेत. भारत बंदमुळे मंगळवारी शेतमाल खरेदी बंद होती. संसदेला व शेतक-यांना विश्वासात न घेता मागच्या दाराने केंद्र सरकारने कृषी तयार केले. त्यामुळे आंदोलनात सहभाग होणे आपले कर्तव्य समजून शेतक-यांनी मंगळवारी शेतमालच विकला नाही. त्यामुळे मंगळवारी दीड कोटींचा व्यवहार ठप्प झाला होता.

कोट

मंगळवारी शेतक-यांनी भारत बंद पुकारल्याने बाजार बंद होता. थोडा विलंब झाल्याने विक्री करता आली नाही. आम्ही बरेच शेतकरी भारत बंदच्या देशव्यापी आंदोलनात सहभागी झालो. पाठींबा दिला. बुधवारपासून बाजार समित्या सुरू झाल्याने अडचण संपली.

-हरीश मुळे, नागभीड

कोट

शेतकरी आंदोलनाची गरजच आहे. मंगळवारी भारत बंद होता. त्यामुळे शेतमाल विकता आला नाही. शेतक-यांनी घरीच शेतमाल ठेवणे पसंत केले होते. बुधवारी खरेदीचे व्यवहार सुरू झाले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर शेतकरी विश्वास ठेवतो. थोडा त्रास झाला तरी खुल्या बाजार बाजाराच्या तुलनेत आमचे हक्क कायम आहेत.

-दीपक पिंपळकर, गोवरी