शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात ‘रेन वॉटर हॉर्वेस्टिंग’बाबत जनजागृती

By admin | Updated: March 25, 2017 00:51 IST

जागतिक जल दिनानिमित्त इको-प्रो संस्थेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी ‘रेन वॉटर हॉर्वेस्टिंग’ बाबत नागरिकांमध्ये पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली.

पत्रकांचे वाटप : ‘ईको-प्रो’चा जागतिक जलदिन उपक्रम चंद्रपूर: जागतिक जल दिनानिमित्त इको-प्रो संस्थेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी ‘रेन वॉटर हॉर्वेस्टिंग’ बाबत नागरिकांमध्ये पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली.२२ मार्च ‘जागतिक जल दिन’ म्हणून साजरा केला जातो. पाण्याची गरज नाही, असे कोणतेच क्षेत्र आढळणार नाही. परंतु, काही दशकांपूर्वी पाण्याचा अविचारी, अयोग्य आणि अतिवापर होत असल्याचे जाणवले. पृथ्वीवरील पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण अगदीच मोजके असल्याने त्याचा अत्यंत जपून वापर करणे, जलस्त्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. चंद्रपूर सर्वाधिक प्रदूषित शहर असताना तेथे भविष्यात पिण्याच्या पाण्याची समस्यासुध्दा उग्र रूप धारण करू शकते. गेल्या काही वर्षां चंद्रपुरात पाणी समस्या मोठया प्रमाणावर वाढत आहे. शहरी भागात तसेच औद्योगिक वापरासाठी मोठया प्रमाणात पाण्याचा उपसा केला जातो. म्हणून आता ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ म्हणण्यापेक्षा पावसाचे पाण्याचे जलपुर्नभरण करणे अगत्याचे झाले आहे. चंद्रपूर शहरातील पाण्याची पातळी जवळपास १००-१५० फुटांपर्यत खोल गेलेली आहे. काही भागात त्यापेक्षा अधिक खोलवर खोदूनही पाणी लागत नाही. पंरतु, त्या प्रमाणात बोअरवेल किंवा विहीरीत पावसाच्या पाण्याचे पुर्नभरण केले जात नाही. याकरिता जागतिक जल दिनाचे औचित्य साधून ईको-प्रो संस्थेच्या सदस्यांनी शहरात ठिकठिकाणी रेन वॉटर हॉर्वेस्टिंगबाबत पत्रके वाटून नागरिकांमध्ये जनजागृती केली. या शहरातील इमारंतीना, शासकीय व निमशासकीय इमांरतीना रेन वॉटर हॉर्वेस्टिंग करावे, या मागण्यांचे निवेदन संस्थेतर्फे महानगरपालिकेला देण्यात आले. या जनजागृती अभियानात संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे, ईको-प्रो पर्यावरण विभागप्रमुख नितीन रामटेके, बंडू दुधे, राजू काहीलकर, मनीष गांवडे, महेश होकर्णे, वैभव मडावी, सागर कावळे, आशिष मस्के, बिमल शहा आदी सहभागी होते. (प्रतिनिधी)