शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य कर्मचारी व परिवाराला विमा कवच द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:28 IST

राजुरा : कोविड १९ या महामारीच्या काळात आपत्ती व्यवस्थापनामध्ये काम करणाऱ्या कर्मचारी अथवा कुटुंबातील सदस्यांकरिता शासकीय रुग्णालयात बेड आरक्षित ...

राजुरा : कोविड १९ या महामारीच्या काळात आपत्ती व्यवस्थापनामध्ये काम करणाऱ्या कर्मचारी अथवा कुटुंबातील सदस्यांकरिता शासकीय रुग्णालयात बेड आरक्षित ठेवण्यासह विमा कवच देण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांना देण्यात आले.

प्राणाची बाजी

लावून कार्य करणाऱ्या या फ्रंटलाईन वर्कर्ससाठी शासनाने या मागण्यांच्या अनुषंगाने सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी संघटनेने जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे मार्फत राज्याच्या आरोग्य संचालकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.

कोविड १९ विषाणूमुळे सुरू झालेल्या जागतिक महामारीमध्ये आरोग्य कर्मचारी ‘फ्रंट लाइन वर्कर्स’ म्हणून रात्रंदिवस ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग फॉलोअप' व इतर सर्वेक्षण करतात. यामुळे त्यांनासुध्दा कोविडची लागण होऊ शकते. याकरिता या कर्मचार्‍यांना व त्यांच्या कुटुंबासाठी शासकीय रुग्णालयात राखीव बेड नसल्याने उपचाराअभावी प्रसंगी प्राण गमवावे लागतात. तसेच कुटुंबातील सदस्यांना गृह विलगीकरणात असताना शासकीय रुग्णालयातून औषधोपचार केले जात नाहीत. उलट तेथून परत पाठवतात. त्यामुळे आरोग्य कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांचा सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गहलोत यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी या रास्त मागण्या असून, त्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शिष्टमंडळात संघटनेचे पदाधिकारी अरुण कांबळे, मधुकर टेकाम, सुजित घोटकर, समर्थ, पत्तीवार, मांडरे, मेश्राम, सुरेश खाडे यांचा समावेश होता.