शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांची घेतली दखल

By admin | Updated: February 14, 2016 00:58 IST

मराठा अंबुजा सिमेंट प्रकल्पाने आपल्या आवश्यकतेपेक्षा मोठ्या प्रमाणात अधिक जमीन संपादित केली आणि त्याचा २० वर्षांपूर्वी प्रकल्पग्रस्तांना अत्यल्प मोबदला दिला.

हंसराज अहीर यांचे आदेश : प्रशासनाने अहवाल पाठवावाचंद्रपूर : मराठा अंबुजा सिमेंट प्रकल्पाने आपल्या आवश्यकतेपेक्षा मोठ्या प्रमाणात अधिक जमीन संपादित केली आणि त्याचा २० वर्षांपूर्वी प्रकल्पग्रस्तांना अत्यल्प मोबदला दिला. यातील अधिकांश जमिनीचा उपयोग केला नसून या उपयोगविना पडीत जमिनी आता संपादनमुक्त केल्या पाहिजे आणि प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या आणि मोबदला देण्यात प्रकल्पाने प्रकल्पग्रस्तांचे शोषण केले असल्याने प्रकल्पग्रस्तांच्या या मागण्या तातडीने पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी जिल्हा प्रशासन आणि अंबुजा प्रकल्पग्रस्तांच्या सोबत झालेल्या बैठकीत सांगितले.येथील स्थानिक विश्रामगृहात जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, राजुऱ्याचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी म्हणून भाजपा नेते खुशाल बोंडे, उपजिल्हाधिकारी (अधिग्रहण) खजांची, रामटेके यांच्यासह राहुल सराफ, राजू घरोटे, मनोहर कुळसंगे, देविदास थिपे, कविकर निरांजने, सज्जन शर्मा, कोंडू टिकले, सतीश उपलेंचवार, हरिश घोरे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी गडचांदूर, लखमापूर, पिंपळगाव, थुट्रा, उपरवाही, सोनापूर, रेनागूडा, सालेगुडा, कुकूडसाथ, विसापूर, हरदोना आदी गावातील प्रकल्पग्रस्तांनी बैठकीत आपल्या समस्या मांडल्या. यातील अनेक प्रकल्पग्रस्तांनी आम्हाला नोकरी दिली नाही आणि आमच्यापैकी अनेकांनी जमिनीचा मोबदला घेतला नसल्यामुळे आम्हाला आमची जमीन कसण्यासाठी परत दिली पाहिजे, असा ना. अहीर व जिल्हाधिकारी यांच्यासमोर आग्रह धरला.याची दखल घेत १२ गावांच्या प्रकल्पग्रस्तांनी अंबुजा सिमेंट कंपनीतर्फे केलेल्या अन्यायाचे गाऱ्हाणे केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या समोर मांडले असताना ना. अहीर यांनी याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी महामार्गावरील जागा अधिग्रहीत करता येत नाही. तरीही प्रकल्पाने कायद्याचे सर्रास उल्लंघन केले असल्याचे स्पष्ट होत असल्याने याची दखल घेवून प्रशासनाने यासंबंधीचा अहवाल तयार करण्यासाठी एका अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी आणि तसा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्याचे निर्देश यावेळी ना. अहीर यांनी दिले.अंबुजा सिमेंट प्रकल्पाने २० वर्षाअगोदर जमिनी अधिग्रहीत करताना प्रकल्पग्रस्तांवर मोठ्या प्रमाणात अन्याय केला असल्याचे सांगत प्रकल्पग्रस्तांवर झालेल्या अन्यायाची दाद मागून या अन्यायाचे निराकरण करण्यासाठी आम्ही प्रकल्पग्रस्तांसोबत असून जिल्हा प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांची दखल घेण्याची यावेळी मागणी करण्यात आली. अंबुजा सिमेंट व्यवस्थापनाने भूमी अधिग्रहण करताना प्रकल्पग्रस्तांना अत्यल्प मोबदला देवून त्यांची फसवणूक केली. हे शोषण आता सहन करणार नसून प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमाने राज्य सरकारकडे हे प्रकरण लावून धरणार असल्याचा निर्धारही ना. अहीर यांनी व्यक्त केला.अत्यल्प मोबदला आणि जमीन पडीत ठेवल्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसह कृषी उत्पादनावरही याचा विपरित परिणाम झाला असून या प्रकल्पग्रस्त शेतकरी आज देशोधडीला लागला आहे. अंबुजा सिमेंट व्यवस्थापनतर्फे करण्यात येणारी प्रकल्पग्रस्तांची लूट आणि शोषण या बैठकीच्या माध्यमाने मांडण्यात आली. जिल्हा प्रशासनाने नवीन भूमिअधिग्रहण कायद्यानुसार प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला आणि नोकऱ्या मिळवून देण्यासाठी प्राधान्याने कारवाई करावी, अशा सूचना यावेळी ना. अहीर यांनी जिल्हाधिकारी व उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी प्रकल्पग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनासमोर आपली बाजू मांडली. (शहर प्रतिनिधी)