शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 05:00 AM2020-03-25T05:00:00+5:302020-03-25T05:01:15+5:30

जिल्ह्यात काही गावांत सिंचनाची सुविधा आहे. अनेक शेतकरी सिंचन करून दुबार पीक घेत आहेत. नगदी पीक म्हणून भाजीपाल्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी शासनाकडून प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. या उपाययोजनेमध्ये आठवडी बाजार बंद करण्याच्या निर्णयाचा समावेश असल्याने हिरवी मिरची, टमाटर, वांगे, पालेभाज्या, फुलकोबींचे मोठे नुकसान होत आहे.

The problems of the farmers increased | शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या

शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या

googlenewsNext
ठळक मुद्देबाजार बंद : संसर्ग होऊ नये म्हणून प्रशासनाच्या उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी नेहमीच अडचणीत सापडत आहे, अशातच शेतकऱ्यांच्या अडचणीत कोरोनानेही भर घातली आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रशासनाने आठवडी बाजार बंद केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा भाजीपाला जागेवरच पडून राहत असल्याने मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
जिल्ह्यात काही गावांत सिंचनाची सुविधा आहे. अनेक शेतकरी सिंचन करून दुबार पीक घेत आहेत. नगदी पीक म्हणून भाजीपाल्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी शासनाकडून प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. या उपाययोजनेमध्ये आठवडी बाजार बंद करण्याच्या निर्णयाचा समावेश असल्याने हिरवी मिरची, टमाटर, वांगे, पालेभाज्या, फुलकोबींचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यावर्षी पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे जलसाठ्यात बºयापैकी वाढ झाली आहे. नदीपात्रात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे नदीकाठाशेजारील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याच्या पिकाची लागवट केली आहे.
कोरोनाच्या सावटामुळे शहरातील बाजारात तसेच आठवडी बाजारतही शुकशुकाट असतो.परिणामी त्यांचे मोठे नुकसान होत आहे. विशेष म्हणजे, शहराशेजारी असलेल्या बहुतांश शेतकऱ्यांकडे भाजीपाला पिकतो. त्यामुळे ते गावात सुद्धा ग्राहक मिळेनासे झाले आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक फटका
शहराजवळील शेतकरी आपला शेतमाल विकण्यासाठी आणतात. मात्र जागतिक स्तरावर कोरोनाचा होणारा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने सार्वजनिक ठिकाणासह आठवडी बाजारावर बंदी आणली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या काळणीवर आलेला भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान होत आहे. भाजीपाला पीक कमी वेळात होणार असल्यामुळे तो वेळेवर काढून वेळेवर मार्केटमध्ये पोहोचण्याची धडपड शेतकºयांमध्ये असते. मात्र शहरातील आठवडी बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. एकतर संचारबंदीमुळे घराबाहेर पडणे बंद आहे. त्यामुळे रोजगार मिळेनासा झाला आहे. त्यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

Web Title: The problems of the farmers increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी