शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या समृद्धतेसाठी सिंचनाला प्राधान्य

By admin | Updated: March 20, 2017 00:40 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी अनेक योजना राबवितांना सिंचनाला प्राधान्य देण्यात येत आहे.

हंसराज अहीर : कोल्हापुरी बंधाऱ्याचे लोकार्पणचंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी अनेक योजना राबवितांना सिंचनाला प्राधान्य देण्यात येत आहे. या अनुषंगाने इंडियन फार्मर्स फर्र्टिलायझर को-आॅपरेटीव्ह लिमिटेड (इफको) ने नागरी येथे बंधारा बांधकाम करून या धोरणाला पुरक असे कार्य केले आहे. यामुळे या भागातील अवर्षण परिस्थिती संपून शेतकऱ्यांना सिंचनाचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या समद्धीसाठी सतत प्रयत्नशील असून अशी विकास कामे आमच्या प्रयत्नांची यशस्विता स्पष्ट करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.वरोरा तालुक्यातील नागरी येथे इफको इफको पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत पोथरा नदीवर ६२ लाख रुपये खर्च करून कोल्हापुरी बंधाऱ्याचे लोकार्पण शनिवारला करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी माजी पालकमंत्री संजय देवतळे, इफकोचे विपनन निर्देेशक अरविंदो रॉय, इफकोचे डॉ. वानखेडे, गाडगे, लोंढे, वरोरा पं.स. च्या नवनियुक्त सभापती रोहीणी देवतळे, उपसभापती विजय आत्राम, सरपंच बेबी पिसे, उपसरपंच चंद्रशेखर नौकरकार, भाजपा नेते शेखर चौधरी, रवींद्र कष्टी, बापु धात्रक आदी उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाला किमान आधारभुत किंमत मिळवून देण्यासाठी केंद्रीय संस्था सीसीआय व नाबार्डला खरेदी करण्यास बाध्य केल्याचे सांगताना शेतकऱ्यांचा माल कमी भावा विकू देणार नाही असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. याप्रसंगी बोलताना माजी पालकमंत्री संजय देवतळे यांनी सातेफळ, नागरी व लाडकी येथील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी इफकोच्या मार्फत बंधारा बांधण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल आभार व्यक्त केले.याप्रसंगी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते नागरी येथे पोथरा नदीवर ६२ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी इफकोच्या पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे निदेशक वानखेडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गाडगे यांनी तर उपस्थिताचे आभार डॉ. भगवान गायकवाड यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. (नगर प्रतिनिधी)