प्राथमिक शिक्षकांची दिवाळी अंधारात

By Admin | Updated: October 18, 2014 23:22 IST2014-10-18T23:22:42+5:302014-10-18T23:22:42+5:30

सावली पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे सप्टेंबर २०१४ चे वेतन व डी.ए. एरिअर्स तसेच दिवाळी अग्रीम धन दिवाळीपूर्वी मिळायला पाहिजे होते. परंतु प्रशासनाच्या अनागोंदी

Primary teachers in Diwali dark | प्राथमिक शिक्षकांची दिवाळी अंधारात

प्राथमिक शिक्षकांची दिवाळी अंधारात

वेतन अडले : आनंदोत्सवावर विरजण
सावली : सावली पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे सप्टेंबर २०१४ चे वेतन व डी.ए. एरिअर्स तसेच दिवाळी अग्रीम धन दिवाळीपूर्वी मिळायला पाहिजे होते. परंतु प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे व संवर्ग विकास अधिकारी यांच्या दुर्लक्षतेमुळे शिक्षकांना यंदाची दिवाळी पगाराविना अंधारातच काढावी लागणार आहे.
सावली पंचायत समितीमधील शिक्षकांचे वेतन न दिल्याने शिक्षकांमध्ये असंतोष व्यक्त केला जात आहे. दरम्यान, शनिवार १८ आॅक्टोबरला सर्व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संवर्ग विकास अधिकारी (उ.श्रे.) पं.स. सावली यांची भेट घेतली असता त्यांनी एकमेकांवर बाजु ढकलून वेळकाढू धोरण अवलंबिले दिसून आले. यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे. दिवाळीपूर्वी सप्टेंबरचा पगार होत नसल्यामुळे बाहेरगावी व जिल्ह्याबाहेर राहणाऱ्या शिक्षकांना पगाराविना स्वगावी जात आहेत.
संवर्ग विकास अधिकाऱ्यांसोबतच शिक्षण विभागातील कनिष्ठ लिपिक व लेखा विभागातील सर्व कर्मचारी यांच्या दुर्लक्षितपणामुळे हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिक्षक वेतनापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे, यावर्षी आजतागयत शिक्षकांच्या समस्याबाबत समस्या निवारण सभा घेण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्व संघटनेच्या वतीने शिक्षण विभाग व लेखा विभागाचा शनिवारी निषेध करण्यात आला. असाच प्रकार पुढे घडल्यास आंदोलनाची भूमिका घेतली जाईल, असा इशारा संघटनांनी दिला आहे.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Primary teachers in Diwali dark