चंद्रपूर जिल्हा कारागृहात प्रबोधन

By Admin | Updated: June 27, 2015 01:30 IST2015-06-27T01:30:02+5:302015-06-27T01:30:02+5:30

कारागृह अधिक्षक जी.के. महाले यांच्या पुढाकारातून कारागृहातील बंदीबांधवासाठी राजर्षी शाहू महाराज ...

Pragodan in Chandrapur District Prison | चंद्रपूर जिल्हा कारागृहात प्रबोधन

चंद्रपूर जिल्हा कारागृहात प्रबोधन

चंद्रपूर : कारागृह अधिक्षक जी.के. महाले यांच्या पुढाकारातून कारागृहातील बंदीबांधवासाठी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज शुक्रवारी प्रबोधनात्मक कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुरूंग अधिकारी आय.वाय. सय्यद होते तर प्रमुख वक्ता म्हणून कारागृह शिक्षक ललित मुंडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ही राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून झाली. तद्नंतर बंद्यामध्ये राजर्षीचे राजकीय कारकिर्द व समाजकार्य याबाबत प्रबोधन करण्यात आले. राजर्षी शाहू महाराज यांचे शैक्षणिक कार्य सांगताना कारागृह शिक्षक ललित मुंडे म्हणाले, बहुजनांना तिमीरातून तेजाकडे नेऊन शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचविणारा पहिला लोकराजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज होय.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण आय.वाय. सय्यद तरुंग अधिकारी यांनी केले. संचालन प्रा. नक्कलवार यांनी केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Pragodan in Chandrapur District Prison