शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेसाठी नातेवाईकांसह मित्र बनले राजकीय शत्रू

By admin | Updated: October 28, 2015 01:20 IST

चिमूर नगर परिषद निवडणुकीचे काऊंटाडाऊन सुरु झाले आहे. प्रचारासाठी अवघे चार दिवस उरले आहेत.

प्रचारात रंगत : मामी-भाचीसह, जावा-जावा एकमेकांविरुद्ध मैदानातखडसंगी: चिमूर नगर परिषद निवडणुकीचे काऊंटाडाऊन सुरु झाले आहे. प्रचारासाठी अवघे चार दिवस उरले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी बरोबरच प्रचाराच्या आखाड्यात राज्यस्तरीय नेतेही उतरले आहेत. त्यामुळे क्रांतीभूमी चिमूरचे रणांगण पेटले आहे. सत्तेसाठी नातेवाईकांसह मित्रही आता राजकीय शत्रू बनले आहेत.चिमूर शहराची ग्रामपंचायत इतिहास जमा झाली आहे. मात्र मागील ग्रामपंचायतीमध्ये सतरा सदस्य होते. त्यामध्ये काँग्रेस, शिवसेना, मनसे अशी अभद्र युती करुन पाच वर्षात अनेक घडामोडी झाल्यात. मात्र ग्रामपंचायत असल्याने त्या निवडणुकीकडे मोठ्या राजकीय पक्षांचे पुढारी तेवढे लक्ष देत नव्हते. तर राजकीय पक्षाच्या चिन्हांचा वापरही करण्यात येत नव्हता. मात्र आता नगरपरिषद झाल्याने राजकीय पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढविल्या जात असल्याने ही निवडणूक सर्वच राजकीय पुढाऱ्यांनी प्रतिष्ठेची केली आहे.प्रचाराला अवघे चार दिवस उरल्याने आरोप- प्रत्यारोपांच्या फैरीतून मागील विधानसभा, लोकसभा, निवडणुकीतील उट्टे काढत भविष्यातील वाटचाल निश्चित केली जात आहे. कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांच्या पक्षाविरुद्ध प्रचंड इर्षा आणि खुन्नस काढली जात आहे. त्यामुळे एकमेकांवर खालच्या स्तरावरुन आरोप करुन टीका केली जात आहे.भाजप व शिवसेना पक्षाचे काही प्रमाणात विचार एक आहेत. त्यामुळेच देशात व राज्यातील सत्तेत दोन्ही पक्ष एकत्रित आहेत. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकामध्ये दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध निवडणूक लढले. तेव्हापासूनच वरच्या राजकारणापासून तर स्थानिक पातळीवरही सेना- भाजपाचे जमले नाही.नगरपरिषदेमध्ये सर्वच पक्षानी स्वबळावर सत्ता स्थापनेची स्वप्ने पहात ‘एकला चलो रे...’ ही भूमिका स्वीकारली आहे, तर सत्तेसाठी वाटेल ते करण्याचा निर्धार उमेदवारांनी केला आहे. प्रचारासाठी पक्षाचे नेते मंडळी प्रभागासह झोपडपट्ट्या पालथ्या घालत आहेत. पायपीट करुन पक्षाच्या उमेदवारांना नगरपरिषदेत पाठविण्यासाठी विणवणी करीत आहेत. प्रचारसभेसाठी राज्यस्तरीय नेत्यांना आमंत्रित केले जात आहे. विरोधकांच्या ‘विक पार्इंट’ची माहिती पुरवून जखमेवर मीठ चोळले जात आहे. नगरपरिषदेची ही पहिलीच निवडणूक असल्याने साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. अनेक प्रभागामध्ये नातेवाईकांसह पक्के दोस्त आमने-सामने ठाकून निवडणूक लढवित आहेत. मामी-भाची, जावा-जावा, मित्र-मित्र एकमेकाविरुद्ध मैदानात उतरल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)