शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

एका लाईनमनवर सहा गावांचा वीज पुरवठा

By admin | Updated: May 14, 2015 01:48 IST

विद्युत वितरण कंपनीचे पोंभूर्णा सर्कलमध्ये देवाडा खुर्द हे मोठे गाव आहे.

पोंभूर्णा: विद्युत वितरण कंपनीचे पोंभूर्णा सर्कलमध्ये देवाडा खुर्द हे मोठे गाव आहे. या गावासह जाम तुकूम, जामखुर्द, रामपूर दीक्षित, हस्तीबोडी ही गावे जोडण्यात आली आहे. या गावात महावितरणाचे एकच कर्मचारी कार्यरत आहेत. देवाडा खुर्द येथे दोन दिवसाआड डिपी उडणे नित्याचीच बाब झाली आहे. त्यामुळे एकाच कर्मचाऱ्यावर या गावांचा भार असल्याने ते पाहिजे त्या प्रमाणात विद्युत सेवा देऊ शकत नाही. परिणामी स्थानिक नागरिकांना अनेकदा अंधारात राहावे लागत आहे.पोंभूर्णा तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकवस्तीचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवाडा खुर्द येथे सहा गावांसाठी एका लाईनमनची व्यवस्था करण्यात आली आहे. सदर परिसराचा विस्तार मोठा असल्याने एका लाईनमनवर कामाचा ताण पडत आहे. तेदेखील पाहिजे त्या प्रमाणात काम करीत नसल्याने स्थानिकांना अनेकदा अंधारात राहावे लागत आहे. याठिकाणी अनेकदा कोणता ना कोणता वीज पुरवठ्यात बिघाड होत असतो. आणि असा बिघाड नेमका सायंकाळच्या वेळी होत असल्याने मोठी पंचायत होते. एक बिघाड दुरुस्त केल्यास दुसरा बिघाड निर्माण होतो. त्यामुळे स्थानिक नागरिकांना अनेकदा अंंधाराचा सामना करावा लागतो. तर कधी कधी सदर कर्मचारी दुसऱ्या ठिकाणी असल्याचे सांगतात. त्यामुळे विद्युत पुरवठा पुर्ववत सुरू होण्यास दोन ते तीन तासांचा अवधी लागतो. याबाबत पोंभूर्णा येथील महावितरण केंद्रात दूरध्वनीवरुन विचारणा केली असता ते बोलायला तयार नसतात. तर वरिष्ठ अधिकारी मात्र रात्रीच्या वेळी सोईच्या शहरात वास्तवाला राहतात. तेसुद्धा आपला दूरध्वनी बंद ठेवतात.या नेहमीच्या खंडीत होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे महागड्या घरगुती वापरातील यंत्रावर परिणाम होत आहे. ते भविष्यात निकामी होऊ शकतात. एखाद्या नागरिकांनी एक महिन्याचे बिल भरले नाही तर वरिष्ठांकडून आदेश असल्याचे सांगून चटकन त्या नागरिकाचा विद्युत पुरवठा खंडीत केला जातो. मग विद्युत पुरवठा खंडीत होत असताना तो तात्काळ सुरू करण्याचे सौजन्य मात्र महावितरण का दाखवित नाही, असा प्रश्न आहे. (तालुका प्रतिनिधी)