जांभूळधरा रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:34 IST2021-07-07T04:34:48+5:302021-07-07T04:34:48+5:30

कोरपना : तालुक्यातील जांभूळधरा फाटा ते गावापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याकडे ...

Poor road condition | जांभूळधरा रस्त्याची दुरवस्था

जांभूळधरा रस्त्याची दुरवस्था

कोरपना : तालुक्यातील जांभूळधरा फाटा ते गावापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याकडे बांधकाम विभागाने लक्ष देऊन तातडीने काम पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

जांभूळधरा फाटा ते गावापर्यंतचा दोन ते तीन किलोमीटरचा मार्ग आहे. पुढे तो उमरहिरा, मांगलहिरा, थिपा, तेलंगणा राज्यातील भवानीगुडा, चमपेल्ली आदी गावांना जोडला गेला आहे. त्यामुळे नियमित दळणवळण यामार्गे सुरू असते. परंतु सद्यस्थितीत रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. परिणामी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच कन्हाळगाव ते रूपापेठ, जांभूळधरा फाटा ते मांगलहिरा, हातलोणी ते धानोली, कन्हाळगाव ते सावलहिरा मार्गावर गावाचे अंतर व दिशादर्शक फलक लावण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

Web Title: Poor road condition