शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

पोलीसपुत्रांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:16 IST

मागील १४ वर्षांत महाराष्ट्र पोलीस दलातील १४६० पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. यातील ३३ टक्के पोलीस कर्मचाºयांचा मृत्यू हृदयविकाराचे तर १५ टक्के पोलीस कर्मचाºयांनी आत्महत्या करुन जीवन संपविले आहे. पोलिसांच्या आत्महत्येसाठी महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानावर आहे.

ठळक मुद्देविविध समस्यांकडे वेधले लक्ष : पोलीस बॉईज संघटना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशसेवेसाठी २४ तास काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे राज्यसरकारचे आणि गृहमंत्रालयाचे लक्ष वेधण्यासाठी पोलीस पुत्रांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. मोर्चाची सुरुवात हनुमान मंदिर बेलेवाडी येथून करण्यात आली. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर जिल्हाधिकारी यांना पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांच्या विविध समस्यांचे निवेदन दिले.मागील १४ वर्षांत महाराष्ट्र पोलीस दलातील १४६० पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. यातील ३३ टक्के पोलीस कर्मचाºयांचा मृत्यू हृदयविकाराचे तर १५ टक्के पोलीस कर्मचाºयांनी आत्महत्या करुन जीवन संपविले आहे. पोलिसांच्या आत्महत्येसाठी महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानावर आहे. हे पोलीस कर्मचाºयांसाठी घातक असून, राज्यातील पोलीस कर्मचारी विविध समस्यांचा सामना करीत आहे. मात्र, शिस्तीच्या नावाखाली पोलीस कर्मचाºयांना मोर्चे, आंदोलन करता येत नसल्याने त्यांच्या समस्यांकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे पोलीस कर्मचाºयांच्या मुलांनी एकत्र येण्याचे ठरवून पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा निर्धार केला. मंगळवारी मोर्चाद्वारे पोलीस कर्मचाºयांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले.यावेळी विधानपरिषदेत पोलीस बॉइज असोसिएशनचा एक प्रतिनिधी नियुक्त करण्यात यावा, होमगार्डसना कायमस्वरुपी नियुक्ती देण्यात यावी, पोलिसांची ड्युटी आठ तास करण्यात यावी, पोलीस कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, पोलीस भरतीत पोलीस बॉइजना दहा टक्के आरक्षण द्यावे आदी मागण्यांचे निवेदन पोलीस बॉइज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी शाहिद सैय्यद, भुवनेश्वर निमगडे, देविदास गिरडे, तोजीतचंद्र पिपरे, अमित वाघमारे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Policeपोलिस