नागरिकांच्या विविध कारणाने पोलीसही हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 05:00 IST2020-04-19T05:00:00+5:302020-04-19T05:00:55+5:30

लॉकडाऊनमुळे सर्वत्र बंद करण्यातआले आहे. घराबाहेर निघण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. असे असले तरी काही उताविळ नागरिक विविध कारणे सांगून घराबाहेर पडत आहे. अचानक जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांची कुचंबणा झाली. त्यामुळे बाहेरगावी अडकलेले गावात येण्यासाठी विविध कारणांचा आधार घेत आहेत.

Police are also frustrated for various reasons | नागरिकांच्या विविध कारणाने पोलीसही हतबल

नागरिकांच्या विविध कारणाने पोलीसही हतबल

ठळक मुद्दे पोलीसी खाक्या दाखविल्यानंतर खोटारड्यांचा खोटेपणा होत आहे उघड

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन असतानाही काही उताविळ नागरिक विनाकारण बाहेर फिरतात. त्यांना पोलिसांनी अडविल्यानंतर आई आजारी आहे, भावाचा अपघात झाला असून त्यांना हॉस्पीटलमध्ये भेटायला जात असल्याचे एवढेच नाही तर भाजीपाला, किराणा आणण्यासाठी जात असल्याचे कारणे देत आहेत. मात्र पोलिसांनी अधिक चौकशी करताच, या कारणामधील खोटेपणा उघड होत असल्याचा प्रकार मागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरातील चौकाचौकांत बघायला मिळत आहे.
लॉकडाऊनमुळे सर्वत्र बंद करण्यातआले आहे. घराबाहेर निघण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. असे असले तरी काही उताविळ नागरिक विविध कारणे सांगून घराबाहेर पडत आहे. अचानक जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांची कुचंबणा झाली. त्यामुळे बाहेरगावी अडकलेले गावात येण्यासाठी विविध कारणांचा आधार घेत आहेत. त्यामुळे कुणी आपल्या धडधाकट आई-वडीलांना आजारी पाडत आहे, इतके आजारी की, त्यांना चालता-फिरताही येत नसल्याचा बहाणा करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवा म्हणजे दूध, औषध, दवाखाने, आरोग्य कर्मचारी आदींसाठी पोलिसांनी ओळखपत्रे दिली आहेत, मात्र त्यानंतरही काही हवशे बाहेर फिरण्यासाठी विविध कारणे सांगत पोलिसांनाच चक्रावून टाकत असल्याचा प्रकार चंद्रपूर शहरात बघायला मिळत आहे.

पोलिसही संतापले...
लॉकडाऊनच्या काळात पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण आहे. दैनंदिन कामाबरोबरच विनाकारण भटकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी त्यांना धावाधाव करावी लागत आहे. लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांमुळे पोलिसांना आराम मिळेनासा झाला आहे. त्यातच प्रवास विनंती अर्जाच्या पडताळणीची मोठी प्रक्रिया त्यांना पार पाडावी लागत आहे.

लॉकडाऊनमुळे संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे विनाकारण नागरिकांना घराबाहेर पडण्यावर निर्बंध आहे. असे असले तरी काही नागरिक काम नसताना घराबाहेर पडत आहे. त्यांना अडविल्यानंतर खोटे कारणे देत सुटण्याचा प्रयत्न करतात, मात्र पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांचा खोटारडेपणा उघड होत आहे.
- हृदयनारायण यादव, वाहतूक निरीक्षक, चंद्रपूर

Web Title: Police are also frustrated for various reasons