शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

जाहीर सभेची परवानगी नाकारली

By admin | Updated: July 5, 2014 23:29 IST

चिमूर जिल्हा मागणीकरिता चिमूर तालुका शिवसेनेच्या वतीने ५ जुलै रोजी नेहरू चौकात जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेला परवानगी मिळण्याकरिता रितसर अर्ज केला असताना शिवसेनेला अनियंत्रीत

ही लोकशाहीची विटंबना : गजानन बुटके यांची टीकाचिमूर : चिमूर जिल्हा मागणीकरिता चिमूर तालुका शिवसेनेच्या वतीने ५ जुलै रोजी नेहरू चौकात जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेला परवानगी मिळण्याकरिता रितसर अर्ज केला असताना शिवसेनेला अनियंत्रीत संघटना असे सांगून परवानगी नाकारली. लोकशाही पद्धतीतील भाषण स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा हा प्रकार आहे. खऱ्या अर्थाने लोकशाहीची विटंबना करणाऱ्या प्रशासनाचा निषेध कोणत्या शब्दात करावा, हाच प्रश्न दत्त म्हणून आमच्यापुढे उभा असल्याचे मत शिवसेना तालुका प्रमुख गजानन बुटके यांनी व्यक्त केले.असंवैधानिक कारणाच्या सबबीखाली दडपशाहीचे धोरण अवलंबिल्याने प्रशासन विरोधी असंतोष पसरल्याने येथील तहसीलदार व ठाणेदार यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी शिवसेना तालुका प्रमुख गजानन बुटके यांनी आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.आज ५ जुलै रोजी स्थानिक नेहरू चौकात चिमूर क्रांती जिल्हा मागणीकरिता सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी ३ जुलै रोजी शिवसेना शहर प्रमुख सचिन पचारे यांनी पोलिसांना सभेची परवानगी मागणारा अर्ज सादर केला होता. त्यानुसार ठाणेदार सुधाकर आंबोरे यांनी सदर परवानगी तालुका दंडाधिकारी यांच्याकडून घेण्यात यावी, असे सूचनापत्र दिले. त्यानुसार सचिन पचारे यांनी तालुका दंडाधिकारी यांना पुनश्च सभेच्या परवानगीकरिता अर्ज सादर केला. मात्र तालुका दंडाधिकारी यांनी आपली जबाबदारी झटकत उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे सादर करीत मार्गदर्शन मागविले. त्यानुसार उपविभागीय अधिकारी यांनी तालुका दंडाधिकारी व ठाणेदार यांना अभिप्राय मागविला. मात्र वस्तुनिष्ठ अहवाल न पाठविता राजकीय दबावात येऊन तथ्यहिन अहवाल सादर केला. त्यामुळे उपविभागीय अधिकारी विजय उरकुडे यांनी सध्या जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये परवानगी नाकारता येत असल्याचे पचारे यांना कळविले. एवढेच नाहीतर सदर सभा चिमूर-कांपा रस्त्याच्या बाजुला असल्यामुळे व शिवसेनेचे कार्यकर्ते अनियंत्रीत असल्याने परवानगी नाकारण्यात येत असल्याचे पत्र पचारे यांना दिल्याचे सांगून शिवसेना तालुका प्रमुख गजानन बुटके म्हणाले, सदर पत्रामुळे चिमूरकरांच्या भावनांची कुचंबना झाली व लोकशाहीची विटंबना झाली. त्यामुळे प्रशासनाचा तिव्र शब्दात बुटके यांनी निषेध केला. (तालुका प्रतिनिधी)