शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्‍या संकटात लोकप्रतिनीधींनी जनतेला सहकार्य करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:29 IST

चंद्रपूर : कोरोना रुग्‍णांची वाढती संख्‍या चिंता वाढविणारी आहे. कोरोनाच्‍या या संकटाचा सामना करताना भाजपचे कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी या ...

चंद्रपूर : कोरोना रुग्‍णांची वाढती संख्‍या चिंता वाढविणारी आहे. कोरोनाच्‍या या संकटाचा सामना करताना भाजपचे कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी या नात्‍याने आपले सक्रिय योगदान देत मास्‍क, सॅनिटायझरचे वितरण नागरिकांमध्‍ये करत जनजागरण करण्‍याची आवश्‍यकता आहे. विशेषत: आपल्‍या भागात जास्‍तीत जास्‍त लसीकरण व्‍हावे, याद़ष्‍टीने सर्व लोकप्रतिनिधींनी प्रयत्‍न करण्‍याची आवश्‍यकता आहे. कोरोनाच्‍या संकटाचा सामना करताना बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रात ३० हजार मास्‍कचे वि‍तरण करण्‍याचे नियोजन आपण केले आहे. त्‍याचप्रमाणे प्राथमिक आरोग्‍य केंद्रांना आवश्‍यक यंत्रसामुग्रीचा पुरवठा करण्‍यासाठी दोन कोटी रुपये निधी आमदार निधीच्‍या माध्‍यमातून खर्च करणार असल्‍याचे प्रतिपादन विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी ऑनलाईन बैठकीच्‍या माध्‍यमातून बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील जिल्‍हा परिषद सदस्‍य, मूल व पोंभुर्णा येथील नगरसेवकांशी संवाद साधला. या संकटकाळात नागरिकांना जास्‍तीत जास्‍त मदत करण्‍याचे आवाहन करत लोकप्रतिनिधींनी जनजागरण, लसीकरण व चाचण्‍या याकडे विशेष लक्ष देण्‍याच्‍या सुचना आ. मुनगंटीवार यांनी दिले. व्‍हेंटिलेटर तसेच ऑक्‍सिजन बेड्स मागण्‍याची वेळच येऊ नये, म्‍हणून सुरुवातीपासूनच काळजी घेण्‍याच्‍या दृष्‍टीने जनजागरण अतिशय महत्त्वाचे असल्‍याचे ते यावेळी म्‍हणाले. आरोग्‍य व्‍यवस्‍था पूर्णपणे कोलमडलेली आहे. जिल्‍हा परिषद सदस्‍यांनी प्राथमिक आरोग्‍य केंद्राच्‍या स्‍तरावर रुग्‍णांना आवश्‍यक ती मदत करावी, रुग्‍णवाहिका उपलब्‍ध नसल्‍यास भाड्याची वाहने त्‍यांना उपलब्‍ध करून दयावी, असे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सूचित केले. मूल शहरात चाचण्‍यांची संख्‍या वाढवावी, असे सांगत उपलब्‍ध असलेल्‍या दोन लसीकरण केंद्रांची संख्‍या चार करण्‍याबाबत आपण प्रशासनाशी चर्चा करू, असेही ते म्‍हणाले. पोंभुर्णा शहरात पाच हजार मास्‍क वितरण करण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले.