शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

लोकांनी न घाबरता लस घ्यावी : नरेश पुगलिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:17 IST

फोटो बल्लारपूर : बल्लारपूर पेपर मिल व्यवस्थापनाच्या वतीने मिलचे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जात आहेत. ...

फोटो

बल्लारपूर : बल्लारपूर पेपर मिल व्यवस्थापनाच्या वतीने मिलचे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जात आहेत. नागपूर येथील किंग्स हॉस्पिटलच्या सहयोगाने आयोजित लसीकरण शिबिराचे उद्घाटन बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेचे अध्यक्ष व माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या हस्ते झाले.

लोकांमध्ये लसीबाबत गैरसमज आहे, तो पूर्णत: चुकीचा असून लस घेणे सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. त्यामुळे लोकांनी भीती न बाळगता लस घ्यावी, कामगार प्रतिनिधींनी त्याकरिता पुढाकार घेऊन जनजागृती करावी, असे आवाहन नरेश पुगलिया यांनी उद्घाटनपर भाषणात केले. पेपर मिलचे युनिट प्रमुख उदय कुकडे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची काळजीपोटी लसीकरण शिबिर घेतले जात असल्याचे सांगत सर्व विभागप्रमुखांना तसे निर्देश देण्यात सांगितले. मानव संसाधन विभाग प्रमुख प्रवीण शाकेर यांनी दोन दिवसात एक हजार लोकांना लस देण्याचे संकल्प असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने लसीकरण प्रक्रिया केली जाईल, अशी माहिती व प्रास्ताविक भाषणातून दिली. या कार्यक्रमात बिल्टचे वरिष्ठ अधिकारी गिरीराज निमा, रजत शिनाय, काँग्रेसचे नेते गजानन गावंडे, अशोक नागापुरे, देवेंद्र बेले, पेपर मिल मजदूर सभेचे वसंत मांढरे, तारासिंग कलसी, रामदास वागदरकर, कृष्णन नायर, वीरेंद्र आर्या, सुभाष माथनकर, अनिल तुंगीडवार, गजानन दिवसे, आशिष मोहता, राजेंद्र शुक्ला, सुदर्शन पुल्ली, गजेंद्र सिंह, विनोद महतो, सुनील बावणे यांची उपस्थिती होती.

040721\fb_img_1625381175381.jpg

लोकांनी न घाबरता लस घ्यावी :- नरेश पुगलिया बल्लारपूर पेपर मिल मध्ये लसीकरण शिबिर