महामार्गावर कोंड्याची ओव्हरलोड वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:00 IST2019-09-07T06:00:00+5:302019-09-07T06:00:34+5:30

राईसमिलची संख्याही मोठ्या प्रमाणात कोंड्याची साठवणूक केली जाते. वीज, विटा व इतर कामासाठी कोंड्याची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने व्यापारी त्यांची साठवणूक करतात. योग्य भाव मिळाल्यास विक्री करतात. कोंड्याची मागणी वाढल्याने ट्रकच्या मार्फतीने त्याची वाहतूक केली जाते.

Overload traffic on the highway | महामार्गावर कोंड्याची ओव्हरलोड वाहतूक

महामार्गावर कोंड्याची ओव्हरलोड वाहतूक

ठळक मुद्देमूल-गडचिरोली मार्ग : धुळीमुळे आरोग्य धोक्यात, संबंधित विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : मूल गडचिरोली महामार्गावरील रस्त्याचे काम सुरु असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावरुन जाताना दुचाकी व चारचाकी वाहनांना मार्ग काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र यातच कोंड्यानी भरलेल्या ओव्हरलोड ट्रकची वाहतूक होत असल्याने मार्ग काढताना अपघाताची शक्यता बळावली आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप जनतेनी केला आहे.
मूल शहरात धानाची व्यापारपेठ मोठ्या प्रमाणात आहे. राईसमिलची संख्याही मोठ्या प्रमाणात कोंड्याची साठवणूक केली जाते. वीज, विटा व इतर कामासाठी कोंड्याची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने व्यापारी त्यांची साठवणूक करतात. योग्य भाव मिळाल्यास विक्री करतात. कोंड्याची मागणी वाढल्याने ट्रकच्या मार्फतीने त्याची वाहतूक केली जाते. जास्त रक्कम मिळावी, यासाठी क्षमतेपेक्षा अधिक कोंडा कोंबून वाहतूक केली जात असल्याने महामार्गावर असणारे खड्डे चुकविताना मोठा अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करु नये, असा नियम असताना देखील नियमाचे उल्लंघन केले जात आहे. मात्र पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. अपघात टाळण्यासाठी ओव्हरलोड वाहतूक होणाऱ्या ट्रकची तपासणी करुन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Overload traffic on the highway