शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘ढैंचा’ बियाणे फुलविणार सेंद्रिय शेती

By admin | Updated: June 9, 2014 23:33 IST

शेतीत रासायनिक खताच्या प्रमाणामुळे जमिनीचा पोत घसरत आहे. त्याचे दुष्परिणामही समोर येत आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीकडे कसे वळणार, यासाठी शासकीय स्तरावरुन उपाययोजना केल्या जात आहे.

चंद्रपूर : शेतीत रासायनिक खताच्या प्रमाणामुळे जमिनीचा पोत घसरत आहे. त्याचे दुष्परिणामही समोर येत आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीकडे कसे वळणार, यासाठी शासकीय स्तरावरुन उपाययोजना केल्या जात  आहे.  चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने पुढाकार घेत यंदाच्या खरीप हंगामासाठी ‘ढैंचा’ बियाणे उपलब्ध करून दिले आहे. जिल्हाभरात तब्बल २२८.२0 क्विंटल ढैंचा बियाणे पंचायत समिती स्तरावर उपलब्ध  करून देण्यात आले आहे. या माध्यमातून शेकडो एकर सेंद्रिय शेती फुलणार आहे.धान उत्पादक पट्टय़ातील शेतकर्‍यांसाठी अत्यंत लाभदायक ठरणारे ढैंचा बियाणे सोयाबीन व कापूस पिकविणार्‍या शेतकर्‍यांसाठी फायदेशीर आहे. दिवसागणिक वाढत चाललेला रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा सल्ला कृषितज्ज्ञ देत आहेत. मात्र अजूनही शेतकरी रासायनिक खताची मागणी करीत आहे. पिकांसाठी रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खत वापरण्याकडे शेतकर्‍यांचा कल वाढावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने पुढाकार घेतला असून सेस फंडातून ८ लाखाची तरतूद ढैंचा बियाण्यांसाठी केली आहे. ७५ टक्के अनुदानावर शेतकर्‍यांना बियाणे पुरवठा करण्याचा कार्यक्रम मंजूर करण्यात आला असून खरीप हंगाम २0१४ करिता जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांना २८८.२0 क्विंटल बियाणे पुरवठा करण्यात आला आहे.  शेतकर्‍यांना  सदर  बियाणे अनुदानावर ९२५ रुपयात मिळणार असल्याची माहिती   कृषी सभापती अरुण निमजे व कृषी विकास अधिकारी प्रवीण देशमुख यांनी दिली. (नगर प्रतिनिधी)