शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

८४ वर्षांपासून सावरगावात एकच गणपती

By admin | Updated: September 9, 2016 00:51 IST

गावातील विवाद विकोपाला जाऊ नयेत, यासाठी शासन एक गाव एक गणपती या संकल्पनेला गेल्या काही वर्षापासून प्रोत्साहन देत आहे.

गाव अस्सल राजकीय : मात्र उत्सवात एकीचे दर्शनघनश्याम नवघडे नागभीडगावातील विवाद विकोपाला जाऊ नयेत, यासाठी शासन एक गाव एक गणपती या संकल्पनेला गेल्या काही वर्षापासून प्रोत्साहन देत आहे. मात्र नागभीड तालुक्यातील सावरगाव येथे ही संकल्पना ८४ वर्षापासून राबविण्यात येत आहे. राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील अशी ओळख असलेल्या या गावात ही संकल्पना राबविली जात असल्याने गावाचे कौतुक केले जात आहे.‘सार्वजनिक गणपती मंडळ’ असे या सावरगावच्या गणपती मंडळाचे नाव आहे. १९३२ साली या मंडळाची स्थापना करण्यात आली. १९३२ ते २०१५ या ८४ वर्षाच्या कालावधीत या मंडळाचे केवळ तीन अध्यक्ष झाले, हे आणखी एक आश्चर्यच म्हणावे लागेल. पहिले अध्यक्ष लक्ष्मण पांडुरंग बोरकर हे होते. ते जवळपास ३० वर्ष अध्यक्ष होते. नंतर रामकृष्ण चिरकुटा सहारे अध्यक्ष झाले. आता मोरेश्वर कुकसू ठिकरे हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.खरेतर सावरगावची ओळख राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील गाव म्हणून तालुक्यात आहे. चार हजार लोकसंख्या असलेल्या या गावात राजकीय कलगीतुरे एवढ्या मोठ्या प्रमाणावर झडतात की त्याची चर्चा अख्ख्या तालुक्यात होते. निवडणुक कोणतीही असो, निवडणुक आली की दोन ध्रृवावर दोघे, अशी या गावाची विभागणी होऊन जाते. सावरगावची ग्रामसभा तर अनेकदा वादाचा विषय होत असते. अनेकदा पोलीस ठाण्यापर्यंत ती पोचली आहे.राजकीयदृष्ट्या सावरगावची अशी पार्श्वभूमी असली तरी गणपती उत्सवाच्या वेळी मात्र संपूर्ण सावरगाव एक होऊन जाते. गणपती उत्सव संपूर्ण गावाचा होऊन जातो. गावात राजकीय मतभेद कितीही आणि काहीही असोत, पण यावेळी या मतभेदांना मुळीच थारा नसतो. ते १० दिवस कोण कोणत्या पक्षाचा आहे, याचा विचारच केला जात नाही. शेवटचे दोन दिवस तर गावात स्वयंस्फूर्तीने बंद पाळला जातो. या दोन दिवसात कोणीही कामावर किंवा शेतावर जात नाही. शेवटच्या दिवशी गावात महाप्रसादाचे आयोजन केले जाते. केवळ गावकरीच नाही तर पंचक्रोशीतील नागरिकही या महाप्रसादाचा लाभ घेत असतात.