शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ४८ टक्के पेरणी

By admin | Updated: July 17, 2017 00:33 IST

जुलै महिना अर्धा संपला असला तरी जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही.

कृषी विभागाचा अहवाल : समाधानकारक पावसाची प्रतीक्षाचलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जुलै महिना अर्धा संपला असला तरी जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेकांची पेरणीची कामे खोळंबली असून आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ४८ टक्के पेरणी झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे. कृषी विभागाने यावर्षी चार लाख ७६ हजार ३०० हेक्टरवर खरीप पीक पेरणीचे नियोजन केले होते. शेतकऱ्यांना बियाणे व खतासाठी अडचण निर्माण होवू नये, यासाठी बियाणे उपलब्ध करून देत खताचे आवंटन मंजूर करून घेतले. मात्र ऐन पेरणीच्या तोंडावर पावसाने दगा दिला. ज्या शेतकऱ्यांनी धुळ पेरणी केली त्यांचे बियाणे पावसाअभावी उगवलेच नाही. त्यामुळे त्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले. अशातच अद्यापही जिल्ह्यात समाधानकार पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे आतापर्यंत केवळ ४८.३४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ११३५ मिमी आहे. मात्र आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी २४८.३४ मिमी पाऊस झाला आहे. सध्या पेरणीची कामे जोमाने सुरू असून चार पुढील आठ ते दहा दिवसांत ८० ते ९० टक्के पेरणी होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. जिल्ह्यात पेरणीचे ४ लाख ३८ हजार २०२ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून ११ जुलैपर्यंत २ लाख ११ हजार ८३५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात सोयाबीन १ लाख ४० हजार ३८८ हेक्टर क्षेत्रापैकी ५५ हजार ५२५ हेक्टरवर पेरणी झाली असून कापूस, धान आदी पिकांची पेरणी केवळ ५० टक्के झाली आहे, असे कृषी विभागाने म्हटले आहे.