शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

नवीन पुलाच्या पिचिंगसाठी जुन्या दगडाचा वापर

By admin | Updated: May 16, 2017 00:33 IST

मूल तालुक्यातील भेजगावजवळील उमा नदीवर दहा कोटी रुपये खर्च करुन मोठ्या पुलाची निर्मिती गतवर्षी करण्यात आली.

कंत्राटदाराची मनमानी : जुन्या पुलातील दगड काढून त्याचा पुनर्वापरलोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव: मूल तालुक्यातील भेजगावजवळील उमा नदीवर दहा कोटी रुपये खर्च करुन मोठ्या पुलाची निर्मिती गतवर्षी करण्यात आली. या पुलाच्या दोन्ही किनाऱ्यावर पाण्याच्या प्रवाहाने रस्ता खचून जाऊ नये म्हणून दगडाची पिचींग सुरु आहे. या पिचींगसाठी नवीन दगड वापरणे गरजेचे असताना कंत्राटदार मात्र लाखो रुपये वाचवून जुन्या लहान पुलाचे काम जेसीबीने खोदून तेथील दगड मोठ्या पुलात पिचींगसाठी वापरत आहे.भेजगाव परिसरातील पंधरा गावांना लहान पुलामुळे पावसाळ्यात तालुक्याचा संपर्क तुटत होता. सदर रस्ता जिल्हा परिषदेकडे असल्याने अनेक वर्षापासून पुलाची समस्या होती. मात्र पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागरिकांची समस्या व पुलाची मागणी लक्षात घेवून मूल- भेजगाव - बेंबाळ हा रस्ता बांधकाम विभागाकडे परावर्तीत करुन या ठिकाणी एका वर्षात नवीन पुलाची निर्मिती केली. कंत्राटदाराने अवघ्या सहा महन्यिात काम पूर्ण करुन शाबासकीही मिळविली. असे असले तरी त्याच्या मनमानी कारभाराने ग्रामस्थ मात्र त्रस्त झाले. जुने पूलच पोखरुन दगड काढल्याने भविष्यात अंत्यविधी करायची कुठे, असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा ठाकला आहे.भेजगाव, येसगाव येथील नागरिक याच लहान पुलावरुन अंत्यविधी नदीपात्रात करतात. मात्र कंत्राटदाराने लहान पुलावरुन नदीपात्रात उतरण्याचे ठिकाणच जेसीबीने पोखरुन टाकल्याने नागरिकांना अंत्यविधीसाठी जाताना अडचण निर्माण झाली आहे. परिणामी ग्रामस्थांचे हाल होत असल्याने ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला आहे. संबंधित कंत्राटदाराचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी आर्थिक साटेलोटे असल्याने अधिकारी या कामाकडे फिरकतही नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. नवीन पुलाच्या पिचींगसाठी लाखो रुपये मंजूर आहेत. मात्र या कामात जुन्याच दगडाचा वापर करुन कंत्राटदाराने अधिकाऱ्यांच्या संगनमताने लाखो रुपयाचा गैरव्यवहार केल्याचे दिसून येते. या कामाची चौकशी होणे गरजेचे आहे.