शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

प्रासंगिक करारासाठी एसटी महामंडळाला मिळाले उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:00 IST

लवकरच प्रासंगिक कराराबाबत उद्दिष्टे ठरवून दिले जाणार आहेत. सदर उद्दिष्टे साध्य करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने आपल्या स्तरावर प्रयत्न करण्याचे निर्देश एसटी महामंडळाने दिले आहेत. विभागीय स्तरावर गत आर्थिक वर्षात झालेल्या प्रासंगिक कराराचा आढावा घेऊ न ज्या शैक्षणिक संस्थानी यापूर्वी एसटी बस घेतली होती.

ठळक मुद्देउत्पन्न वाढीसाठी प्रयत्न : विभागीय नियंत्रण पर्यवेक्षकाकडे पालकत्व

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लग्न, यात्रा, धार्मिक व शैक्षणिक सहलीकरीता प्रासंगिक करारावर एसटी बसेस उपलब्ध करून देण्याचे प्रमाण वाढवून एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढावे, यासाठी एसटी महामंडळामार्फत नियोजन करण्यात येत आहे. त्या अंतर्गत विभागीय पातळीवरील अधिकार, पर्यवेक्षकांची पालक अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. याकरिता लवकरच प्रासंगिक कराराबाबत उद्दिष्टे ठरवून दिले जाणार आहेत. सदर उद्दिष्टे साध्य करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने आपल्या स्तरावर प्रयत्न करण्याचे निर्देश एसटी महामंडळाने दिले आहेत.विभागीय स्तरावर गत आर्थिक वर्षात झालेल्या प्रासंगिक कराराचा आढावा घेऊ न ज्या शैक्षणिक संस्थानी यापूर्वी एसटी बस घेतली होती. अशा संस्थांशी संपर्क साधला जाईल. शैक्षणिक सहलीसाठी बसेस उपलब्ध करून देण्यात येतील. ज्या शैक्षणिक संस्थानी यापूर्वी एसटी महामंडळाची बस न घेता खासगी बसेस वापरल्या असतील, अशा संस्थांशी संपर्क साधून महामंडळाच्या बसेस घेण्याबाबत त्यांना विनंती करावी, विभागीय स्तरावर प्रत्येक आगारासाठी आवश्यकतेप्रमाणे स्वतंत्र दर मंजूर करावेत, कोणत्याही कारणास्तव प्रासंगिक करारावर बसची मागणी नाकारू नये, अशा सूचना राज्य परिवहन महामंडळाने संंबंधित अधिनस्त यंत्रणांना दिल्या आहेत. सुरक्षित प्रवासासाठी

एसटी महामंडळाच्या बसेस घ्याव्यातप्रासंगिक करारावर बसेस उपलब्ध करून देण्यासाठी कोणती बस मार्गावर बंद पडणार नाही. किंवा कामांसाठी अडचण निर्माण नाही. याची दक्षता घेण्याबाबत कळविण्यात आले आहे. शैक्षणिक संस्था व सामाजिक संस्था किंवा व्यक्तींनी सुरक्षित प्रवासासाठी एसटी महामंडळाच्या बसेस प्रासंगिक करारावर घ्याव्यात, असे आवाहन एसटी महामंडळामार्फत करण्यात आले आहे.काय आहे प्रासंगिक करारलग्न सोहळ्यासाठी वऱ्हाडी मंडळींना एसटीने घेऊ प जात असत. तसेच धार्मिक यात्रेसाठी बसेस भाड्याने मिळत असत. याला प्रासंगिक करार असे म्हणतात. गेल्या काही वर्षात खासगी बसेस कंपन्यांनी या क्षेत्रात आगेकूच केल्याने एसटी बसेस भाडेतत्वावर देण्याचे प्रमाण वाढले आणि यातून एसटीचे उत्पन्न वाढावे, यासाठी प्रासंगिक करारावर भर दिला जात आहे.

टॅग्स :Socialसामाजिक