शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार

By admin | Updated: June 29, 2014 23:50 IST

चंद्रपूर आणि गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील ओबिसींच्या जिल्हानिहाय आरक्षणामध्ये ओबीसींवर अन्याय झाला आहे. हा अन्याय दूर करुन दोन्ही जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गातील जिल्हानिहाय आरक्षणात

चंद्रपूर : चंद्रपूर आणि गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील ओबिसींच्या जिल्हानिहाय आरक्षणामध्ये ओबीसींवर अन्याय झाला आहे. हा अन्याय दूर करुन दोन्ही जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गातील जिल्हानिहाय आरक्षणात वाढ करावी किंवा पूर्ववत आरक्षण ठेवावे, या मागणीसाठी दोन्ही जिल्ह्यातील ओबीसींचे शिष्टमंडळ आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्त्वात मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. मागणी पुर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा वडेट्टीवार यांनी दिला आहे.काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस लोकशाही आघाडी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुस्लिमांना ५ टक्के आणि मराठ्यांना १६ टक्के आरक्षण देवून ५२ टक्के आरक्षणावरुन ७३ टक्के आरक्षण करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. हा निर्णय योग्य असून आता ओबीसींच्या जिल्हानिहाय आरक्षणातही वाढ करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी ओबीसींच्या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी १ जुलै रोजी मनोरा आमदार निवास मुंबई येथे सकाळी ११ वाजता एकत्रित यावे, अशी विनंती माजी राज्यमंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ओबीसींची संख्या ५५ टक्के असून नोकरीमध्ये पूर्वी १९ टक्के जिल्हानिहाय आरक्षण होते. परंतु यात मागील काही वर्षात बदल करून ११ टक्के आरक्षण करण्यात आले. तसेच गडचिरोली जिल्ह्यात ओबीसींची संख्या ३८ टक्के असून नोकरीमध्ये पूर्वी १९ टक्के जिल्हा निहाय आरक्षण होते. परंतु आता १९ टक्क्यांवरुन कमी करत पाच टक्के जिल्हानिहाय आरक्षण करण्यात आले आहे.विशेष म्हणजे, हे दोन्ही जिल्हे नक्षलग्रस्त आहेत. ओबिसीमधील बेरोजगार युवकांना पूर्वी दोन्ही जिल्ह्यात ओबीसी आरक्षणाद्वारे नोकरी मिळत होती. परंतु जिल्हा निहाय आरक्षणामध्ये ओबीसींचे आरक्षण कमी केल्याने ओबीसी प्रवर्गातील बेरोजगार युवकांना हक्काच्या नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे. याप्रकारामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी बांधवाची गळचेपी होत आहे. ज्याप्रमाणे मुस्लिम आणि मराठ्यांना आरक्षण दिले त्यापमाणे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींच्या जिल्हा निहाय आरक्षणात वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. (नगर प्रतिनिधी).