शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
5
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
6
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
7
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
9
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
10
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
11
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
12
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
13
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
14
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
15
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
16
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
17
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
18
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
19
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
20
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४९५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 05:01 IST

गुरुवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये नागभीड तालुक्यातील सहा, बल्लारपुरातील तीन, गडचांदुरातील एका बाधिताचा समावेश आहे. याशिवाय कोरपना तालुक्यातील पालगाव येथील यापूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील पुरुष व तीन वर्षीय बालकाचा समावेश आहे. राजुरा ठाण्यातील पोलीस पॉझिटिव्ह ठरला आहे. राजुरा येथील तेलंगणा राज्यातून प्रवास केलेली युवती तपासणीअंती पॉझिटिव्ह निघाली आहे.

ठळक मुद्दे३११ कोरोनातून बरे : नव्या २८ बाधितांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या ४९५ झाली आहे. यापैकी ३११ बाधित बरे झाले आहेत तर १८४ जण उपचार घेत आहेत. गुरूवारी एकूण २८ नवे बाधित पुढे आले आहेत.जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकाही बाधिताचा मृत्यू झालेला नाही. बाधित दुरुस्त होण्याचा दर राज्यात ५७.१४ असताना जिल्ह्यात हा दर ६४ आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २१ हजार ६३१ चाचण्या घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत गेल्या चार महिन्यांमध्ये ९० हजार २८२ नागरिक परत आलेले आहे. तर ६० हजारांवर नागरिक जिल्ह्यातून बाहेर गेले आहेत.गुरुवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये नागभीड तालुक्यातील सहा, बल्लारपुरातील तीन, गडचांदुरातील एका बाधिताचा समावेश आहे. याशिवाय कोरपना तालुक्यातील पालगाव येथील यापूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील पुरुष व तीन वर्षीय बालकाचा समावेश आहे. राजुरा ठाण्यातील पोलीस पॉझिटिव्ह ठरला आहे. राजुरा येथील तेलंगणा राज्यातून प्रवास केलेली युवती तपासणीअंती पॉझिटिव्ह निघाली आहे.ब्रह्मपुरी तालुक्यातील वांढरी येथील पुरुष संपर्कातून बाधित ठरला आहे. नागभीड तालुक्यातील किरमिटी मेंढा येथील युवक बाधित ठरला आहे. दिल्ली येथून आल्यानंतर हा युवक संस्थात्मक अलगीकरणात होता.चंद्रपुरातील पठाणपुरा सवारी बंगला परिसरातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील २६ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह ठरला आहे. ब्रह्मपुरी येथील कुडेसावलीतील पुरुष यापूर्वीच्या एका बाधितांच्या संपर्कातून पॉझिटिव्ह ठरला आहे. कागज नगर येथून प्रवास केला असल्याची नोंद असलेला सिंदेवाही तालुक्यातील २३ वर्षीय युवक पॉझिटिव्ह ठरला आहे. अफगाणीस्तानातून परत आल्यानंतर श्वसनाचा आजार जाणवू लागल्यामुळे दुर्गापूर वार्ड, चंदू बाबा गेट जवळील ४९ वर्षीय व २० वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. याशिवाय नागभीड येथील वार्ड क्रमांक सहामधील बुधवारी निघालेल्या दोन पॉझिटिव्हच्या संपर्कातील दोन युवक व २० वर्षीय महिला अ‍ॅन्टिजेन चाचणीमध्ये पॉझिटिव्ह ठरली आहे. नागभीड येथील सिनेमा टॉकीज परिसरातील ६० वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरली आहे. राजुरा तालुक्यातील चुनाळा गावातील पुरुष पॉझिटिव्ह आला आहे. चिमूर तालुक्यातील ब्राह्मणी येथील महिला व केवळ नऊ दिवसांची मुलगी अ‍ॅन्टिजेन चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आली आहे.चंद्रपूर येथील बागडे हाऊस वार्ड नंबर १६ मधील ३२ वर्षीय पुरुष अ‍ॅन्टिजेन चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आला आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या