शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत परगावातून येणारे नागरिक वाढले, चाचण्या तेवढ्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 05:00 IST

आगस्ट, सप्टेंबर व आक्टोबर महिन्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले. आगस्ट व सप्टेंबर महिन्यात तर दररोज अडीचशे-तीनशे रुग्ण आढळून येत होते. नोव्हेंबर महिन्यात दिवाळीचा काळ असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक परगावातून जिल्ह्यात दाखल झाले. अशावेळी रुग्णांची संख्या झपाट्याने वाढेल,असे वाटले होते. परगावातून आलेल्या नागरिकांकडून कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी म्हणून आरोग्य विभागाकडून कोरोना चाचण्या वाढविल्या जातील, असेही वाटले होते.

ठळक मुद्देनोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात २२३६ नव्या बाधितांची भर

  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दिवाळीच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात परगावातून मोठ्या प्रमाणात नागरिक दाखल झालेत. मात्र प्रशासनाकडून चाचण्यांचा वेग तेवढाच दिसला. त्यामुळे नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमीच राहिली. नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात एकूण १२ हजार ७९४ चाचण्या करण्यात आल्या. यापैकी दोन हजार २३६ चाचण्या पॉझिटिव्ह निघाल्या.आगस्ट, सप्टेंबर व आक्टोबर महिन्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले. आगस्ट व सप्टेंबर महिन्यात तर दररोज अडीचशे-तीनशे रुग्ण आढळून येत होते. नोव्हेंबर महिन्यात दिवाळीचा काळ असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक परगावातून जिल्ह्यात दाखल झाले. अशावेळी रुग्णांची संख्या झपाट्याने वाढेल,असे वाटले होते. परगावातून आलेल्या नागरिकांकडून कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी म्हणून आरोग्य विभागाकडून कोरोना चाचण्या वाढविल्या जातील, असेही वाटले होते. मात्र चाचण्या पूर्वीसारख्याच होत राहिल्या. 

१ नोव्हेंबरला जिल्ह्यात एक लाख २० हजार ९२४ चाचण्या पूर्ण झाल्या होत्या. १९ नोव्हेंबरला एक लाख ३३ हजार ७१८ चाचण्या पूर्ण झाल्या. म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात एकूण १२ हजार ७९४ चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांपैकी २ हजार २३६ जणांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. दिवाळीनिमित्त बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. कोरोना नियमांचे कुठेही गांभीर्याने पालन होताना दिसले नाही. आता दिवाळी आटोपली आहे. आता कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात टेस्टींगसाठी गर्दीनोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभी कोविड टेस्टींग सेंटरमध्ये फारशी गर्दी दिसून आली नाही. या कालावधीत नागरिक दिवाळीच्या धामधूममध्ये होते. मात्र त्यानंतर थंडीची एक लाट आली. याशिवाय वातावरणात बदल घडून आला.  त्यानंतर चाचण्या वाढल्या.

१४ नोव्हेंबरपासून कोविड टेस्टींग सेंटरमध्ये चाचण्यांसाठी नागरिकांची गर्दी दिसून आली. याशिवाय शाळा-महाविद्यालये सुरू होणार असल्याने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी करून घेतल्याने चाचण्यांची संख्या वाढली.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या