शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आता पर्यटकांना घेता येणार खाण पर्यटनाचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 06:00 IST

चंद्रपूर जिल्हा नैसर्गिक साधन संपत्ती, जगप्रसिद्ध ताडोबा अभयारण्य, तसेच ऐतिहासिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. याव्यतिरिक्त चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा खाणी विपूल प्रमाणात आहे. या खाणींमध्ये सुरू असलेल्या कामाचे कुतूहल प्रत्येक नागरिकाला तसेच पर्यटकाला असते.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे पाऊल : वेकोलि देणार खाणींचा अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नैसर्गिक साधन संपत्ती तसेच ऐतिहासिक गोष्टीसाठी प्रसिद्ध असणाºया चंद्रपूर जिल्ह्यात पर्यटकांना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासोबतच आता खाण पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच तातडीची बैठक पार पडली.चंद्रपूर जिल्हा नैसर्गिक साधन संपत्ती, जगप्रसिद्ध ताडोबा अभयारण्य, तसेच ऐतिहासिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. याव्यतिरिक्त चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा खाणी विपूल प्रमाणात आहे. या खाणींमध्ये सुरू असलेल्या कामाचे कुतूहल प्रत्येक नागरिकाला तसेच पर्यटकाला असते. खाणीमध्ये सुरू असलेले काम जाणून घेण्याची जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तसेच वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड यांच्या सहकार्याने पावले उचलली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या पर्यटकाला प्रत्यक्ष खाणीला भेट देऊन खाण पर्यटनाचा आनंद घेता यावा. याकरिता नियोजन करण्याच्या दृष्टीकोनातून बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ तसेच वेकोलिचे प्रतिनिधी व इको प्रोचे संस्थापक अध्यक्ष बंडू धोतरे उपस्थित होते.खाणीबाबत प्रत्येकाला उत्सुकताचंद्रपूर शहराला ब्लॅक गोल्ड सिटी म्हटले जाते. चंद्रपूरसह जिल्ह्यात अनेक कोळसा खाणी आहेत. काही भूमिगत तर काही खुल्या खाणी आहेत. या खाणीत नागरिकांना जाऊ दिले जात नाही. केवळ वेकोलि अधिकारी व कर्मचारीच खाणीत जातात. त्यामुळे या खाणीतील काम कसे चालते, भूमिगत कोळसा खाणी कशा असतात, याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. अनेकांनी तर केवळ चित्रपटामधूनच भूमिगत कोळसा खाणी पाहिल्या आहेत. आता पर्यटक म्हणून नागरिकांनाही कोळसा खाणी पाहून तेथील कामे कशी होतात, हे पाहता येणार आहे.लवकरच होणार सामंजस्य करारया बैठकीमध्ये खान पर्यटनात पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाने सविस्तर नियोजन करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. तसेच वेस्टन कोलफिल्ड लिमिटेडने खाण पर्यटनाच्या दृष्टीकोनातून वापरता येणाऱ्या कोळसा खाणी शोधाव्यात व त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवावा. तसेच पर्यटकाला कोळसा खाणीच्या कार्यप्रणालीची व्हिडीओद्वारे माहिती देण्याची व्यवस्था करावी. सोबतच महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ, वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांचा संयुक्तिक सामंजस्य करार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहेत.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी