शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
3
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
4
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
5
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
6
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
7
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
8
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
9
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
10
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
11
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
12
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
13
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
14
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
15
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
16
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
17
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
18
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
19
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
20
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई

आता स्मशानभूमीतही जागा मिळेना; अंत्यविधीसाठी प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 5:00 AM

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात दररोज १५००पेक्षा अधिक  बाधित रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना रुग्णासह मृतकांच्या आकडेवारीतही वाढ होत आहे. चंद्रपूर शहरात कोरोनाने मृत्यू झालेल्यांवर पठाणपुरा गेटबाहेर असणाऱ्या शिव मोक्षधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. येथे एकाचवेळी सात ते आठ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था आहे.

ठळक मुद्देचंद्रपूर शहरातील वास्तव : मृतांची संख्या वाढल्याने अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना महामारीचे संकट गहिरे होत आहे. शहरात दररोज कोरोनाने २० ते २५ जणांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे चंद्रपुरातील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी प्रशासनावर ताण येत आहे. कधीकधी ओटे उपलब्ध नसल्यास खालीसुद्धा अंत्यसंस्कार उरकण्यात येत असल्याचे विदारक वास्तव आहे.जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात दररोज १५००पेक्षा अधिक  बाधित रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना रुग्णासह मृतकांच्या आकडेवारीतही वाढ होत आहे. चंद्रपूर शहरात कोरोनाने मृत्यू झालेल्यांवर पठाणपुरा गेटबाहेर असणाऱ्या शिव मोक्षधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. येथे एकाचवेळी सात ते आठ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था आहे. मात्र, आता कोरोनाने दररोज मृत्यू होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अंत्यसंस्काराठी प्रतीक्षा करावी लागत आहे. मनपा महापौर राखी कंचर्लावार यांनी नुकतीच स्मशानभूमीची पाहणी करुन ५० ते ६० मृतदेह ठेवता येतील, इतक्या क्षमतेने सिमेंट क्राकीट प्लॅटफॉर्म  बांधण्याचे निर्देश दिले.

२२ जिगरबाज योध्यांकडून विधिवत अंत्यसंस्कार

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचा अंतिमसंस्कार हा संवेदनांना गोठवून टाकणारा क्षण. निर्बंधामुळे नातलगसुध्दा मृतदेहाला खांदा देऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत परिवार, कुटूंब, धर्म, समाज बाजूला ठेवून चंद्रपूर महानगरपालिकेचे २२ जिगरबाज योद्धे मागील ९ महिन्यापासून न थकता अंतिम संस्कारासाठी जीवाची बाजी लावत आहेत. चंद्रपुरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यसंस्कार पठाणपुरा गेटबाहेर इरई नदीच्या काठावर असणाऱ्या शिव मोक्षधाम स्मशानभूमीत केले जाते. या स्मशानभूमीत गेल्या वर्षभरात आतापर्यंत सातशेहून अधिक कोरोनाबाधीतांच्या मृतदेहावर त्यांच्या धर्मातील प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. 

अत्यविधीस उशीर झाल्याने मारहाण२३ एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास डिझेल वेळेत न पोहचल्याने अंत्यविधीला उशीर झाला. यावेळी मृताच्या नातलगांनी मजूर कर्मचारी मिलिंद शंकरराव पुट्टेवार (२६) याला शिवीगाळ करुन हाताबुक्यांनी मारहाण केली व पळुन गेले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरुन कलम ३२३, ५०४, ५०६ भादंविप्रमाणे एनसी नोंद करण्यात आली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू