शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी आता प्रधानमंत्री किसान मानधन योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:27 IST

अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या वृद्धापकाळात आरोग्यपूर्ण व आनंदी जीवन जगता यावे, याकरिता त्यांना आर्थिक मदत व्हावी. या दृष्टीकोनातून केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरू केली असून याचा लाभ मोठ्या संख्येने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.

ठळक मुद्देकुणाल खेमनार : जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या वृद्धापकाळात आरोग्यपूर्ण व आनंदी जीवन जगता यावे, याकरिता त्यांना आर्थिक मदत व्हावी. या दृष्टीकोनातून केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरू केली असून याचा लाभ मोठ्या संख्येने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.बहुतेक शेतकरी वृद्धावस्थेतील निवार्हासाठी अत्यंत अल्प बचत करतात किंवा बहुतांश शेतकºयांची कोणतीही बचत नसते आणि त्यांच्याकडे उत्पन्नाचा इतर स्रोत उपलब्ध नसतो. अशा अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करता यावी व वृद्धापकाळात आनंदी जीवन जगता यावे, याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत सर्व पात्र अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी असून त्यांना यातून भविष्यात मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे शेतकºयांनी याकडे सकारात्मकतेने बघण्याची गरज आहे.नोंदणीसाठी आवश्यक पात्रताप्रधानमंत्री किसान मानधन योजना ही ऐच्छिक व अंशदायी पेन्शन योजना असून शेतकरी हा १ आॅगस्ट २०१९ रोजीच्या वयानुसार १८ ते ४० वर्षे या वयोगटातील असावा. तसेच तो अल्प किंवा अत्यल्प भूधारक शेतकरी असावा. याशिवाय त्याच्याकडे आधार कार्ड व बँकेचे खाते असावे.

टॅग्स :Farmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना