शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

आता गृहकराची आकारणी भांडवली मूल्यांवर

By admin | Updated: January 11, 2016 00:53 IST

ग्रामपंचायत कर आकारणीतील बदल आणि न्यायालयाच्या स्थगितीमुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची मागील नऊ महिन्यात एक रुपयाही करवसुली होऊ शकली नाही.

नव्याने कर आकारणी : ग्रामपंचायत कर आकारणीवरील स्थगिती उठवलीराजकुमार चुनारकर खडसंगीग्रामपंचायत कर आकारणीतील बदल आणि न्यायालयाच्या स्थगितीमुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची मागील नऊ महिन्यात एक रुपयाही करवसुली होऊ शकली नाही. राज्य शासनाने इमारतीच्या क्षेत्रफळावरील आकारणी रद्द करून नव्याने भांडवली मुल्यावर कर आकारणी निश्चित केली आहे. त्यामुळे आता गृहकराची आकारणी क्षेत्रफळाऐवजी भांडवली मुल्यावर होणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना याचा चांगलाच फटका बसणार आहे.ग्रामपंचायत गृहकराबाबत टाकण्यात आलेल्या जनहित याचिकेवरुन करावर न्यायालयाने स्थगिती दिली होती. ही स्थगिती नुकतीच उठविण्यात आली आहे. याबाबतचा ग्राम विकास विभागाचा आदेश संबंधित जिल्हा परिषदेत धडकला आहे. या निर्णयामुळे एप्रिल २०१५ पासून थांबलेल्या कर वसुलीला पुन्हा सुरुवात होणार आहे. शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे आता क्षेत्रफळाऐवजी भांडवली मुल्यावर कर आकारणी करण्यात येणार आहे. भांडवली मुल्यावर कर आकारणी करताना शासनाने सुरुवातीच्या काळात ती सध्याच्या काही पटीने वाढविण्यात येणार असल्याचा आराखडा प्रसिद्ध केला होता. त्यानंतरच्या सुधारित आराखड्यात कर आकारणी फक्त दुप्पट ते चार पट होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शासनाने २ जानेवारी २०१६ रोजी आदेश काढून नेमकी किती आकारणी होणार, हे त्यात स्पष्ट केले होते. भांडवली मुल्यावर आकारणी करताना इमारतीचा घसारा या किमतीतून वजा करण्यात येणार आहे. त्या समितीची मार्गदर्शक तत्वेही त्यात सांगितली आहेत. इमारतीचे भांडवली मुल्य काढताना इमारतीच्या क्षेत्रफळ, जमिनीचे वार्षिक मुल्यदर, इमारतीच्या प्रकारानुसार आकारणी, घसारा, इमारतीचा घरघुती, व्यावसायिक आणि वाणिज्य वापरासाठीचे निर्देशांक गृहीत धरण्यात येणार आहेत. यासाठी भूमिअभिलेख विभागात रेडीरेकनरचा वापर करण्यात येणार असून यासाठी अधिकाऱ्यांपासून ग्रामसेवकांनाही चांगलीच कसरत करावी लागणार आहे.